S. Jaishankar News : परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर काळाराम चरणी

Nashik News : केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी गुरुवारी (ता.१६) श्री काळाराम मंदिरात येऊन दर्शन घेत महापूजा केली.
Foreign Minister Dr. S. Jaishankar visit Kalaram Temple
Foreign Minister Dr. S. Jaishankar visit Kalaram Temple esakal
Updated on

Nashik News : विविध कार्यक्रमांसाठी शहरात आलेल्या केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी गुरुवारी (ता.१६) श्री काळाराम मंदिरात येऊन दर्शन घेत महापूजा केली. श्री महंत सुधीरदास महाराज यांनी प्रधान संकल्प सोडत मंत्री महोदयांचा महावस्त्र देऊन सत्कार केला. देशाचे नाव जगात उज्ज्वल व्हावे, जागतिक पातळीवर शांतता नांदावी, यासाठी प्रभू रामचंद्रांना साकडे घातल्याचे त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. (Union Minister of External Affairs S. Jaishankar visit to Shri Kalaram temple)

यावेळी विश्‍वस्त मंडळातर्फे त्यांचा श्रीरामाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. एस. जयशंकर यांचे सकाळी दिल्लीहून ओझर विमानतळावर आगमन झाल्यावर साडेनऊच्या सुमारास श्री काळाराम मंदिर येथे आगमन झाले. त्या ठिकाणी श्रीरामाचे दर्शन झाल्यावर त्यांनी महापूजा केली. महंत सुधीरदास महाराज यांनी महावस्त्र देऊन त्यांचा सत्कार केला.

या वेळी माध्यम प्रतिनिधींनी संपर्क साधला असता भारत जागतिक पातळीवर महासत्ता व्हावी, जगभर शांतता नांदावी, सक्षम नेतृत्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता सुखी समाधानी व्हावी, यासाठी श्रीरामरायांना साकडे घातल्याचे सांगितले. (latest marathi news)

Foreign Minister Dr. S. Jaishankar visit Kalaram Temple
Nashik Lok Sabha Constituency : धर्मसत्तेतील साधू-महंतांना राजसत्तेचा मोह कशापायी?

या वेळी विश्‍वस्त धनंजय पुजारी, मंदार जानोरकर, डॉ. एकनाथ कुलकर्णी, शुभम मंत्री, ॲड. अजय निकम, पंडित प्रणव पुजारी, मुकुंद पुजारी आदी उपस्थित होते. दर्शनानंतर मंत्री महोदयांचे भोसला महाविद्यालयाकडे प्रयाण केले. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त होता.

Foreign Minister Dr. S. Jaishankar visit Kalaram Temple
Nashik Lok Sabha Constituency : राजाभाऊ वाजे यांचे ‘कुटुंब उतरलंय प्रचारात’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com