Kiren Rijiju : संविधान प्रत्येक भारतीयाचा आत्मा : केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू

Latest Nashik News : २६ नोव्हेंबरला न भूतो न भविष्यती अशा प्रकारे संविधान दिन केंद्र शासनाकडून साजरा केला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी केले.
Union Parliamentary Affairs Minister Kiran Rijiju, Chief Guest along with Minister Chhagan Bhujbal saluting the Mahabodhi Tree at Trirashmi Buddha Caves on its first anniversary.
Union Parliamentary Affairs Minister Kiran Rijiju, Chief Guest along with Minister Chhagan Bhujbal saluting the Mahabodhi Tree at Trirashmi Buddha Caves on its first anniversary.esakal
Updated on

नाशिक : बोधगया, श्रीलंका त्यानंतर नाशिक असा या बोधिवृक्षाचा प्रवास झालेला आहे. तो वृक्ष ज्ञानाचे प्रतीक आहे. यामधून अनेकांना ज्ञान प्राप्त करण्याची ऊर्जा मिळेल. केंद्र सरकार संविधान बदल करणार असा चुकीचा प्रचार समाज माध्यमांवर केला जात आहे. संविधान फक्त हक्क आणि कर्तव्य साठीचे दस्ताऐवज नव्हे तर ते प्रत्येक भारतीय नागरिकाचा आत्मा आहे.

ते कुठल्याही परिस्थितीत बदलले जाणार नाही. उलट येणाऱ्या २६ नोव्हेंबरला न भूतो न भविष्यती अशा प्रकारे संविधान दिन केंद्र शासनाकडून साजरा केला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी केले. (Kiren Rijiju bodhi vruksh abhivadan)

त्रिरश्मी लेणी येथील महाबोधिवृक्षाच्या प्रथम वर्धापन दिन व भिक्खू निवासस्थानाच्या भूमिपूजन सोहळ्यात शनिवारी (ता. १२) ते बोलत होते. यावेळी भिक्खू प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो, प्रा. डॉ. एम. सत्यपाल महाथेरो, सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आमदार देवयानी फरांदे, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त अशोक करंजकर, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व सोहळ्याचे आयोजक भिक्खू सुगत थेरो व संघरत्न यांची प्रमुख उपस्थिती होती.

रिजिजू म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांमध्ये आम्ही जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिल्याचे सांगतात. बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या पाली भाषेला अभिजात दर्जा देण्याची घोषणा केली. मंत्री भुजबळ म्हणाले की, जगामध्ये अनेक देश आपापल्या धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करीत आहेत.

काही देशांमध्ये तर लढाया, युद्ध व रक्तरंजित क्रांती सुरू आहे. मात्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव अशी व्यक्ती आहे की ज्यांनी रक्ताचा थेंब न सांडवता कोट्यवधी नागरिकांचे धर्मांतर घडवून आणले, ही जगातील दुर्मिळ घटना आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रकाश लोंढे यांनी प्रास्ताविक व सोनाली म्हरसाळे यांनी सूत्रसंचालन केले. आर्यनाग यांनी आभार मानले. यावेळी आनंद सोनवणे, राकेश दोंदे, रंजन ठाकरे, गणेश गीते, अर्जुन पगारे, प्रशांत दिवे, पूनम सोनवणे, भगवान दोंदे, संजय खैरनार उपस्थित होते. (latest marathi news)

Union Parliamentary Affairs Minister Kiran Rijiju, Chief Guest along with Minister Chhagan Bhujbal saluting the Mahabodhi Tree at Trirashmi Buddha Caves on its first anniversary.
Who Killed Baba Siddique: 2019 मध्ये हत्या, तुरुंगात बिश्नोई गँगशी ओळख अन् मुंबईत गोळीबार... कोण आहे बाबा सिद्दीकींची हत्या करणारा कर्नेल सिंग?

सत्तर वर्षांनंतर बौद्ध कायदामंत्री

सत्तर वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री होते. त्यानंतर बौद्ध धर्मातील व्यक्तीला कायदामंत्री बनण्याची संधी ही मला मिळाली, मी अतिशय भाग्यवान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनमधील निवासस्थान हे केंद्र शासनाच्या पाठपुराव्याने आपल्या देशाला मिळालेले आहे.

शासन बौद्ध धर्म व त्या संबंधित सर्व संघटनांच्या मागण्यांसंदर्भात अतिशय सकारात्मक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडित चैत्यभूमी, दीक्षाभूमी या महत्त्वाच्या वास्तू आहेत तसेच यापुढे महाबोधिवृक्षाचेही नाव भविष्यात घेतले जाईल, असेही रिजिजू म्हणाले.

Union Parliamentary Affairs Minister Kiran Rijiju, Chief Guest along with Minister Chhagan Bhujbal saluting the Mahabodhi Tree at Trirashmi Buddha Caves on its first anniversary.
Latest Maharashtra News Updates: शासकीय इतमामात बाबा सिद्दिकींवर अंत्यविधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.