Unseasonal Rain : अवकाळीचा ‘शिमगा’; उत्तर महाराष्ट्राला जबर फटका

वादळी वारा, विजांच्या गडगडाटासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा उत्तर महाराष्ट्राला फटका बसला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही पावसाने नुकसान झाले आहे.
Agriculture Loss
Agriculture LossSakal
Updated on
Summary

वादळी वारा, विजांच्या गडगडाटासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा उत्तर महाराष्ट्राला फटका बसला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही पावसाने नुकसान झाले आहे.

नाशिक - वादळी वारा, विजांच्या गडगडाटासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा उत्तर महाराष्ट्राला फटका बसला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही पावसाने नुकसान झाले आहे. पालघरमध्ये आंबा, काजू धोक्यात आला असून नाशिक जिल्ह्यात द्राक्षे, आंबा, कांदा, गहू, मका, भाजीपाला आणि हरभऱ्याला फटका बसला आहे. काढणीला आलेला गहू भुईसपाट झाला आहे.

इगतपुरी (जि. नाशिक) तालुक्याच्या पूर्व भागामध्ये गारपीट झाली. तसेच निजामपूर (जि. धुळे) येथेही गारांचा खच पडला होता. पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, ठाणे, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रविवारी रात्री बाराला वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. आळंद (ता. फुलंब्री) परिसरात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला. सोयगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीने हजेरी लावली. नागदसह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिके जमीनदोस्त झाली. नागद ते बनोटी रस्त्यावरील अनेक झाडे रस्त्यावर आडवी पडून वाहतूक ठप्प झाली होती.

चिंचोली लिंबाजी परिसरात मध्यम पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. टाकळी राराय (ता. खुलताबाद) परिसरात नुकसान झाले. चापानेर (ता.कन्नड) परिसरात अवकाळीचा फटका बसला. गंगापूर शहरात रिमझिम पावसाने हजेरी लागली. जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्याने पिके झाली आडवी झाली. केदारखेडा, जवखेड्यात ज्वारी, गहू जमीनदोस्त झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार कांद्याचे दीड कोटीहून अधिक, गव्हाचे १७ कोटींपर्यंत, भाजीपाल्याचे पन्नास लाखांपर्यंत, द्राक्षांचे दहा कोटींपर्यंत, तर आंब्याचे बारा लाखांपर्यंत नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये आज सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासात ९ आणि त्यानंतर सायंकाळपर्यंत २.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Agriculture Loss
Covid Cases Rise : कोरोना अहवाल मागितल्याने महापालिका वैद्यकीय यंत्रणा ॲलर्ट

नाशिक जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे कांद्यासह गहू, हरभरा या रब्बी पिकांचे आणि द्राक्षे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.

- डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

आज विदर्भ, मराठवाड्यात वादळी शक्यता

आज, मंगळवारी मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. आजपासून ९ मार्चपर्यंत महाराष्ट्रात गडगडाटी आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर वाऱ्याचा ताशी वेग ३० ते ४० किलोमीटर असा राहण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()