Nashik Unseasonal Rain Damage: रौळस पिंप्रीच्या अमोल पाटीलचे सर्वस्वच गारपीटीने हिरावले

Amol Patil standing in the damaged vineyard.
Amol Patil standing in the damaged vineyard.esakal
Updated on

निफाड : उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, असे म्हटले जाते. त्यामुळे पदवीनंतर थेट शेतीत स्वत:ला झोकून दिले, पण गारपीट काळ बनून आली अन्‌ हातातोंडाचा घास हिरावला. रौळस पिंप्रीतील गारपीटीच्या केंद्रबिंदू ठरलेल्या द्राक्षबागेत उभा राहून अमोल पाटील आपबिती सांगत होता. (Nashik Unseasonal Rain Damage Amol Patil of Rauls Pimpri lost everything due to hail)

निफाड तालुक्यात रविवारी दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस अन‌ गारपीटीने नुकसानग्रस्त झालेल्या द्राक्ष बागांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घडांचा सडा अन्‌ पालापाचोळा अस्ताव्यस्त पडलेला होता.

एमएपर्यंत शिकलेला अमोल पाटील जेमतेम पंचवीशीतील तरुण. द्राक्षशेतीत आपले करिअर करीत होता. साडेचार बिघेपैकी तीन बिघ्यात थाँमसन प्रतवारीची द्राक्षबाग उभी केली होती. निर्यातक्षम द्राक्षाचे स्वप्न उराशी बाळगून होतो, पण गारपीट काळ बनून आली अन्‌ होत्याचे नव्हते झाले.

Amol Patil standing in the damaged vineyard.
Unseasonal Rain Damage: अवकाळीग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष पॅकेजचा प्रस्ताव : मंत्री अनिल पाटील

डोळ्यासमोर हातातोंडाशी आलेला घास ओरबडला गेला. थोडेफार टोमॅटो होते. ते बेभाव विकावे लागले. डोक्यावर बँकेचे पाच लाखांचे कर्ज आहे. ते कसे फेडायचे? आईवडिल, भाऊ, वहिनी व पुतण्या यांचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न आहे.

नवीन उभारी घेता येईल, पण त्यासाठी आवश्यक पतपुतवठा होणार कुठून हेच कळत नाही. आता भेटीगाठी अन्‌ पाहणी दौरे सुरू आहेत.

पण पुढे काय, असा प्रश्न रात्रंदिवस आमच्यासह सर्वच शेतकऱ्यांना पडला आहे, अशी आर्त आळवणी देत अमोल पाटीलने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

Amol Patil standing in the damaged vineyard.
Nashik News: औषध सेवन करीत युवतीने संपवले जीवन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.