Nashik Unseasonal Rain Damage : 'वळिवा'मुळे वीटभट्टी व्यावसायिक संकटात

Nashik News : अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून, मागील दोन ते तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या वळिवाच्या पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे.
Nandu Jadhav brick kiln damaged by rain at Taked.
Nandu Jadhav brick kiln damaged by rain at Taked.esakal
Updated on

सर्वतीर्थ टाकेद : बांधकाम क्षेत्राचा कणा असलेल्या वीटभट्टी व्यवसायाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून, मागील दोन ते तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या वळिवाच्या पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. ऐन हंगामात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिक संकटात सापडला आहे. (Unseasonal Rain Damage Brick kilns in business crisis)

कोरोना काळात या व्यवसायावर मंदीचे सावट पसरले होते. आता विटांची मागणी वाढल्याने दर देखील वाढले आहेत. विटेचा सध्या जागेवर प्रत्येकी ७ रुपये दर, तर पोच ७.५० रुपये दराने विक्री होत आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून घरघर लागलेल्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले होते. मात्र, वळिवाच्या पावसाने पुन्हा या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.

जोरदार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कच्च्या विटांचा चिखल झाला आहे. अलिकडच्या दहा वर्षात अनेक सुशिक्षित बेरोजगार या व्यवसायात उतरल्याने स्पर्धेतून दर्जेदार विटांची निर्मिती टाकेद परिसरासह तालुक्यात केली जात आहे. तालुक्‍यात लहान-मोठे व्यावसायिक, शेतकरी शेतातील मातीचा उपयोग करून मजुरांवर आर्थिक गुंतवणूक करीत वीटभट्टी व्यवसाय करतात.

मात्र, पावसाने दाणादाण केली. मध्यरात्री आलेल्या पावसामुळे विटांचे संरक्षण करण्यासाठी व्यावसायिकांना अवधीच मिळाला नाही. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊन वीट व्यावसायिक संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे. (latest marathi news)

Nandu Jadhav brick kiln damaged by rain at Taked.
Nashik Lok Sabha Election : मद्य, पैसा, सोशल मीडियावर विशेष लक्ष; नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचा आढावा

"तेजीत आलेल्या व्यवसायाला अचानक वळिवातील पावसाचा जोरदार फटका बसला आहे. रात्रीच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू झाल्याने संरक्षणात्मक उपाययोजना करता आली नाही. त्यामुळे कच्च्या विटांच्या मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, मोठा आर्थिक फटका बसला आहे." - नंदू जाधव, वीट व्यावसायिक, टाकेद बुद्रूक

"कच्चा माल तयार करण्यासाठी कोळसा, माती, तूस, राख यासह मजुरांवर आर्थिक गुंतवणूक केली आहे. ऐन मोसमात सर्व मेहनतीवर पाणी फिरले असून, पावसामुळे कच्च्या विटांचा चिखल झाला आहे. यामुळे लाखो रुपयांचे मोठे झाले आहे." - रामनाथ जाधव, वीटभट्टी व्यावसायिक, टाकेद बुद्रूक

Nandu Jadhav brick kiln damaged by rain at Taked.
Nashik Lok Sabha Constituency : राजाभाऊ वाजे यांचे ‘कुटुंब उतरलंय प्रचारात’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.