Nashik Unseasonal Rain Damage: नांदगाव तालुक्यात गारपिटीचा दणका! 40 हून अधिक गावात मालमत्तेसह चारा, पिकांची हानी

Here are the blown letters of the house. In the second photograph, the damage to the Rohitra of the Power Distribution Department.
Here are the blown letters of the house. In the second photograph, the damage to the Rohitra of the Power Distribution Department.esakal
Updated on

नांदगाव : तालुक्याच्या अनेक भागात रविवारी (ता.२६) अवकाळी पावसासोबत वादळवाऱ्यासह झालेल्या गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले. अगोदरच दुष्काळाच्या दाहकतेने होरपळणाऱ्या तालुक्याला गारपिटीचा तडाखा बसला.

काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचे पोल पडल्याने काही भागात रात्र अंधारात काढावी लागली. नागापूर, हिसवळ खुर्द, शास्त्रीनगर, धोटाणे, वाखारी, कोंढार, पिंप्राळे, साकोरा, नवे पांझण, सारताळे जामदरी आदी चाळीसहून अधिक गावांना पावसाने झोडपून काढले.

सर्वात मोठी हानी शास्त्रीनगर व पंचक्रोशीतल्या परिसराची झाली. वादळवाऱ्यामुळे या गावातल्या तीसहून अधिक घरांचे पत्रे उडून गेले. हे उडालेले पत्रे जनावरांच्या अंगावर जाऊन पडल्याने चार ते पाच जनावरे मृत्युमुखी पडली. (Nashik Unseasonal Rain Damage Hailstorm in Nandgaon Taluka Loss of fodder crops along with property in more than 40 village)

अवकाळीने तालुक्यात अक्षरक्षः हाहाकार उडविला आहे. दहा ते पंधरा एमएमच्या आकाराच्या गारांचा मारा सोसावा लागला. त्यात शास्त्रीनगर येथील ज्ञानेश्वर दैने त्यांची बहिण संगीताताई या दोघांच्या डोळ्याला मोठ्या आकाराची गार लागल्याने डोळ्याला गंभीर इजा झाली.

याच गावात वीज वितरण विभागाचे रोहित्र पोलासकट कोलमडून पडल्याने दुष्कळात तेरावा महिना याची अनुभूती शास्त्रीनगरच्या ग्रामस्थांना घेतली. धोटाणे येथील समशानभूमी चे वादळाने पत्रे उडाली व स्मशानभूमीची दैना झाली.

रविवारी अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले, या दरम्यान वीजांचा कडकटाटही सुरुच होता.तर अनेक ठिकाणी वादळामुळे झाडे रस्त्यावर कोलमडून पडली. ठिकठिकाणी कांदा पिकांचे, इतर तालुक्यातून विकत घेऊन साठवलेल्या चाऱ्याचे व मालमत्तेचे नुकसान झाले.

पावसासोबत गारपिटही झाली. दहाबारा एमएम आकाराची गार पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी छताची हानी झाली. साकोरा, सारताळे, जामदरी भागात रस्त्यावर वीज वितरणाचे खांब कोसळले. रस्त्याच्या दुतर्फा गारांचा खच पडला होता.

Here are the blown letters of the house. In the second photograph, the damage to the Rohitra of the Power Distribution Department.
Nashik Unseasonal Rain Damage: नाशिकमध्ये 5 ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना

हिसवळ खुर्द येथील पेट्रोलपंप लावण्य फ्यूल स्टेशनचे मोठे नुकसान झाले. के. डी. देशमुख माध्यमिक विद्यालयाच्या कार्यालयाचे पत्रे उडाल्याने साहित्याचं मोठे नुकसान झाले. घरावरील सौर ऊर्जेच्या पॅनल बोर्डचेही अतोनात नुकसान झाले.

वाखारी येथे दुपारी चारला विजांसह वादळ, गारा व मुसळधार पाऊस झाला. त्यात बाळू रामचंद्र चव्हाण यांच्या सोलर पंपचे मोठे नुकसान झाले. नागापूरच्या शेतकऱ्यांच्या द्रक्षाच्या बाग गारपिटीने आडव्या झाल्या.

आमदार सुहास कांदे यांच्या सूचनेनंतर रविवारी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या पंचनाम्यांच्या कामांना आज सकाळी प्रारंभ झाला. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक या तीन स्तरावर हे पंचनामे सुरु होते, नुकसानीचा प्राथमिक अंदाजाचा आकडा देण्याबाबत तालुका कृषी विभाग आज असमर्थ ठरले.

कृषी विभागातील अनेकांनी सुटी म्हणून फोन स्वीकारणेच बंद केले होते. याचाही अनुभव यानिमित्त माध्यम प्रतिनिधींना आला.

Here are the blown letters of the house. In the second photograph, the damage to the Rohitra of the Power Distribution Department.
Nashik Unseasonal Rain Damage: 33 हजार हेक्टरला अवकाळीचा तडाखा; सर्वाधिक फटका द्राक्ष पंढरीला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.