Nashik Unseasonal Rain Damage : अवकाळीचा पिकांना फटका, घरांची पडझड! आजपासून पावसाचा जोर ओसरणार; 13 धरणे शंभर टक्के भरली

Latest Rain Update News : शनिवार (ता. २८)पासून पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.
Nashik Unseasonal Rain Damage
Nashik Unseasonal Rain Damage esakal
Updated on

Nashik Unseasonal Rain Damage : पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. २७)ही दमदार हजेरी लावल्याने खरिपाच्या पिकांसह घरांनाही तडाखा बसला. धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस झाल्याने १३ धरणे १०० टक्के भरली असून, पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, शनिवार (ता. २८)पासून पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. (Nashik Unseasonal rain damage to crops houses)

जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील साठा ९८.३० टक्के झाला आहे. २१ ते २३ सप्टेंबर या तीन दिवसांत इगतपुरी आणि नांदगाव तालुक्यातील ३०६ शेतकऱ्यांचे जवळपास ८४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यात भात, मका आणि कांदा पिकांचा समावेश आहे.

त्यातच चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अन्य तालुक्यांतही नुकसान झाले असून, तेथील पंचनाम्यांचे काम सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे.

दिवाळीच्या आसपास काढणी अपेक्षित असलेल्या मक्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मुसळधार पावसामुळे मका शेतात पाणी साचले असून, कापणीपूर्वी अंकुर फुटण्याचा धोका वाढला आहे. पूर्ण बहरात असलेल्या आणि सध्या चांगला भाव मिळणाऱ्या टोमॅटो पिकालाही सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. (latest marathi news)

Nashik Unseasonal Rain Damage
Nashik Heavy Rain Damage: नाशिककरांना परतीच्या पावसाने झोपडले! रस्ते पाण्यात; वाहतूक कोंडीचा मनस्ताप, जनजीवन प्रभावीत

रोपांच्या मुळापासून वर आलेला पिकांचा भाग पावसामुळे खराब होत असून, पिकांवर आलेल्या काळसर बुरशीमुळे पिकांची निर्यात गुणवत्ता कमी होईल; तर पावसानंतरच्या उष्णतेमुळे भुरी आणि करपा यांसारख्या रोगांचा धोका वाढेल. त्यामुळे फुलांच्या कळ्या आणि मुळांचे संपूर्ण नुकसान होऊ शकते, परिणामी पाने पिवळी पडतात आणि पिके निकामी होत आहेत.

सप्टेंबर धोक्याचा

गेल्या वर्षी दुष्काळ असताना सप्टेंबर २०२३ मध्ये १४ दिवसांत २६०.५१ मिलिमीटर (१३६ टक्के) पाऊस झाला. चालू वर्षी सप्टेंबरमध्येच ९७ टक्के पाऊस झाला. परतीच्या पावसाचा यंदाही फटका बसल्याचे दिसून येते.

Nashik Unseasonal Rain Damage
Nashik Heavy Rain Damage: परतीच्या पावसाचा 84 हेक्टरला तडाखा! कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज; मका, भात अन कांद्याचे सर्वाधिक नुकसान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.