Nashik Unseasonal Rain: ठाणगाव परिसरासह पाडळी शिवारात सुमारे अर्धा ते पाऊण तास पावसाची जोरदार हजेरी

Nashik Unseasonal Rain
Nashik Unseasonal Rainesakal
Updated on

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, शनिवारीरोजी कोकण, गोवा किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीवर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला होता.

त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात ठाणगाव परिसरातील पाडळी, आधी गावांमध्ये शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पाणी साचलेले होते. त्यातच सकाळपासूनच वातावरणात बदल झाल्याने सर्वीकडे गारठा निर्माण झाला होता. (Nashik Unseasonal Rain Heavy rain in Padali Shivara along with Thangaon area for about half an hour to quarter of hour)

Nashik Unseasonal Rain
Mumbai Unseasonal Rain : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची दमदार हजेरी; दिवाळी साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची तारांबळ

अचानक शनिवारी दुपारी सुमारे चार ते पाच वाजेच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्याने संपूर्ण शेतामध्ये पाणी साचलेले बघावयास मिळाले. अचानक आलेल्या पावसामुळे पशुपालकासह शेतीमध्ये काम करीत असलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.

नदी नाल्यांना थोड्याफार प्रमाणात पाणी येईल अशी आशा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली असून रब्बी पिकांनाही या पावसाचा फायदा होईल, असे शेतकरी वर्ग सांगत आहे.

"दिवसभर वातावरणात गारठा निर्माण झाल्याने पाऊस येण्याची शक्यता निर्माण झाली असता दुपारी चार वाजता पावसाने हजेरी लावून संपूर्ण परिसरात पाणीच पाणी केले होते. रब्बी पिकांसाठी हा पाऊस चांगला असला तरी काही ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही." - चंद्रभान रेवगडे, पाडळी

Nashik Unseasonal Rain
Pune Unseasonal Rain : वरसगाव येथे ३५ मिलीमीटर पाऊस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.