नांदगाव : कधी दुष्काळ, कधी अवकाळी तर कधी गारपीट अशा विविध नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या तालुक्याला गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून टाकले आहे. अचानक आलेल्या नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश आमदार सुहास कांदे यांनी तालुकास्तरीय यंत्रणेला दिले. (nashik Unseasonal rain in Nandgaon taluka MLA Kande instructions for panchnama of crops marathi news)
गेल्या दोन दिवसापासून नांदगाव तालुक्यात अवकाळी पावसाने व गारपिटीने जोरदार हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. विशेषतः तालुक्यातील आमोदे, बोराळे परिसरात २७ आणि २८ मार्चला वादळी वाऱ्यासह गारपिटीने हजेरी लावल्याने कांदा, मका, शेवगा, डाळिंब आदी पीके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
अवकाळीनंतर आमदार सुहास कांदे यांच्या सूचनेनंतर तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने नुकसानग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्याच्या कामाला वेहेळगाव येथून प्रारंभ केला. यावेळी श्री. काळे, तलाठी तुषार येवले, कृषी सहाय्यक राहुल जैन, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पगार, सरपंच वैशाली पगार, उपसरपंच भूषण पगार, कृष्णा पगार, रामकृष्ण पगार, समाधान पगार, वाल्मीक पगार, युवा सेना तालुकाप्रमुख सागर हिरे, प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते. (Latest Marathi News)
"दोन दिवसापासून तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गारपिटीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल कृषी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्याने लवकर मदतीबाबत कार्यवाही होईल."-सुहास कांदे, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.