Nashik Unseasonal rain News : वणी परिसरात तासभर अवकाळी; उघड्यावरील कांद्याचे नुकसान

Nashik News : वणी व परिसरात बुधवारी (ता.८) सुमारे तासभर मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला.
Unseasonal rain
Unseasonal rain esakal
Updated on

वणी : मे महिन्यातील उन्हाच्या झळा तीव्र होत असताना वणी व परिसरात बुधवारी (ता.८) सुमारे तासभर मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पावसाने नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. (Unseasonal rain in Wani area for an hour)

बुधवारी (ता.८) दुपारी पाचच्या सुमारास वणी परिसरात अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन मेघ गर्जनेसह सुमारे तासभर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे घराबाहेर कामानिमित्त पडलेल्या नागरिकांची तसेच येथील बाजार समितीच्या उपबाजार आवारात ट्रॅक्टर व पिकअपमधून कांदा विक्रीस आणलेल्या शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. (latest marathi news)

Unseasonal rain
Nashik Salon Rates Hike : दाढी-कटींगच्या दरातही वाढ! या तारखेपासून होणार लागू

यावेळी शेतकऱ्यांची कांदा ताडपत्रीने झाकण्यासाठी एकच धावपळ उडाली तर काही शेतकऱ्यांचा उघड्यावर असलेला कांदा भिजल्याने नुकसान झाले. तसेच शेतातही काढून ठेवलेला कांदा भिजल्याने नुकसान झाले आहे.

दरम्यान अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

Unseasonal rain
Nashik Lok Sabha Election : वयोवृद्ध, दिव्यांगांचे आजपासून मतदान; नाशिक मध्य विधानसभेत 1 हजार 264 वृद्ध, 212 दिव्यांग मतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.