Nashik Unseasonal Rain : ऐन दुष्काळात ‘अवकाळी’ ठरला लाभदायी; कासारीला कांदाचाळ भस्मसात

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने दुष्काळाने होरपळणाऱ्या तालुक्यात जोरदार हजेरी लावली.
Unseasonal Rain
Unseasonal Rain esakal
Updated on

नांदगाव : शनिवारी (ता. ११) रात्री साडेदहानंतर आलेल्या अवकाळी पावसाने दुष्काळाने होरपळणाऱ्या तालुक्यात जोरदार हजेरी लावली. वीज कोसळण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये कळमदरी येथे गाय ठार, तर कासारी येथील हटकर वस्तीवर संतोष शिंगाडे यांच्या घराशेजारील कांदाचाळ खाक झाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. (Nashik Unseasonal rains hit drought stricken taluk)

वादळामुळे विजेचे खांब आडवे झाल्याने खंडीत झालेला वीजपुरवठा दुसऱ्या दिवशी सकाळी सुरु झाला. शनिवारी रात्री साडेआठनंतर हवामानात बदल होत सोसाट्याचा वारा सुरु झाला. काही वेळाने हलक्या गारा पडू लागल्या. त्यातच आसमंत दणाणून सोडणाऱ्या विजांचा गडगडाट सुरु झाला. नंतर जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु झाली ती पहाटे सहापर्यंत सुरुच होती.

दहा तासात १०२ मिलीमीटर पावसाची नोंद शहरातील पर्जन्यनामापक यंत्रात करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईच्या समस्येने बेजार असलेल्या साकोरा परिसराला अवकाळी पावसाने एकप्रकारे दिलासा दिला. मोरखडीच्या बंधाऱ्यात निम्म्याहून अधिक जलसंचय झाल्याने आजूबाजूच्या विहिरींना पाणी उतरण्यास मदत झाली.

गंगाधरी गावच्या वरच्या डोंगररांगेतून रात्री उशिरा नदी-नाले एकत्रित दुथडी भरून वाहू लागल्याने बहुतांश भागात शेतात पाण्याचे तळे साचले. ऐन टंचाईच्या काळात आलेला अवकाळी पाऊस काही ठिकाणी नुकसानकारक ठरत असला तरी भूगर्भातील जलाशयाच्या पातळीला पूरक ठरला आहे. (latest marathi news)

Unseasonal Rain
Nashik Lok Sabha Election : 62 मतदान केंद्रांची ‘वायरलेस’वर भिस्त; मोबाईल नेटवर्क कमी पडल्याने उपाययोजना

पावसामुळे बारा तास वीजपुरवठा खंडित झाला. दूरध्वनी सेवाही विस्कळीत झाली. शाकंबरी नदीवरील फुलेनगर, क्रांतीनगर भागात पाणी साचल्याने विहिरींना पाणी उतरले. मौजे साकोरा येथे वादळी पावसाने कल्पना समाधान बोरसे, मच्छिंद्र निवृत्ती मंडलिक, संजय सुखदेव बोरसे, प्रकाश पुरुषोतम खैरनार, सुनंदा साहेबराव बोरसे यांच्या पोल्ट्रीचे अतोनात नुकसान झाले.

दोन दिवसांत पंचनामे

कासारी, कसाबखेडा, गंगाधरी, साकोरा, कळमदरी, जामदरी पट्ट्यात दमदार पाऊस झाला. साकोरा परिसरात पाच ते सात जणांच्या पोल्ट्री फॉर्मच्या शेडचे अतोनात नुकसान झाले. शेडचे पत्रे उडाले. गारपिटीमुळे पोल्ट्रीफॉमधील शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. महसुली यंत्रणा निवडणुकीच्या प्रशिक्षणात व्यस्त असल्याने पंचनाम्यांना सुरुवात झाली नव्हती. मात्र, दोन दिवसात पंचनाम्याचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.

Unseasonal Rain
Nashik Police : आठवडाभर पोलिसांच्या सुट्ट्या रद्द! 20 तारखेपर्यंत अधिकारी- अंमलदार ‘ऑनड्युटी’

झाडे उन्मळली. भिंती पडल्या

कसाबखेडा येथील अंदाजे दहा जणांच्या घरांच्या भिंती पडल्या. घरावरील पत्रे उडाले. कळमदरी येथील भरत सूर्यवंशी यांची गाय वीज कोसळून ठार झाली. कासारी येथील कांदाचाळ वीज पडल्याने भस्मसात झाली. परधाडी येथील मच्छिंद्र पोपट चौधरी यांच्या राहत्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले. कळमदरीच्या शिवाजी बोरसे यांचे पत्राशेड वादळामुळे पडले. स्टेशन रोडवरचे १२५ वर्षाचे निंबाचे जुने झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

नांदगाव पर्जन्यमान नांदगांव १०२ मिमी

मनमाड मनमाड ०. ५

जातेगाव 06.00

हिसवळ बु 02.00 mm

वेहळगाव 14.00 mm

Unseasonal Rain
Nashik Lok sabha Election: शहरात केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या दाखल! लोकसभा निवडणूक बंदोबस्त; कडेकोट नियोजन अंतिम टप्प्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.