मालेगाव : देशाला आत्मनिर्भर, विकसित, प्रगतीशील व विकास पथावर नेत अग्रणी राष्ट्र बनविण्यासाठी एनडीए आघाडीला मतदान करा. याउलट विरोधी इंडिया आघाडीला हा देश लुटायचा आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करतांनाच आरक्षण देण्याचा कॉंग्रेसचा हा डाव देशाच्या विभाजनाची आधारशिला आहे. (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath)
देशात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना येथे थारा नाही अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी (ता. १८) मालेगाव येथे जाहीर सभेत केली. योगी आदित्यनाथ म्हणाले की, मुघलांचा आतंक सुरु असतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची पताका फडकावली. याच औरंगजेबची आत्मा काॅंग्रेसमध्ये घुसली.
त्यातुनच कॉंग्रेस अध्यक्ष राम मंदिरावर घाला घालण्याची भाषा करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे वर्षांचे स्वप्न साकार केले. राम मंदिराची निर्मिती केली. जगात भारताचा सन्मान वाढवला. सिमापारच्या आतंकवादी कारवाया बंद झाल्या. देशातील ८० कोटी जनतेला मोफत धान्य मिळत असतांना पाकिस्तान सर्वत्र भीक मागत आहे. तेथील जनता अन्नासाठी त्रस्त आहे.
आपल्या देशात व्यापारी व महिला सुरक्षित झाल्या. प्रत्येक हिंदू सणापूर्वी दंगली होत होत्या त्यांना आळा बसला. सुरक्षेच्या बाबतीत प्रत्येकजण निर्भर झाला. देशाची दहा वर्षात लक्षणीय प्रगती केली. रस्ते, पूल, विमानतळ अशा शेकडो पायाभूत सुविधांचे जाळे रचले. जेवढी पाकीस्तानची लोकसंख्या आहे तेवढे देशातील नागरीक दारिद्र्य रेषेच्या वर आले.
४ कोटी गरीबांना घरे मिळाली. ५० कोटी जनधनची खाती उघडली. बारा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधी, आयुष्यमान भारत योजनेत पाच लाखाचा मोफत उपचार, शेतकरी आत्महत्या थांबल्या. गरीब व शेतकरी कल्याणाच्या योजना राबविण्यात आल्या. आयआयटी, एम्स साकारले. घरोघरी नळ व पाणी आले. (latest marathi news)
आम्हाला सत्ता सेवेसाठी व देशाच्या सन्मानासाठी हवी आहे. हा नया भारत आहे. हा करुन दाखवतो. आम्ही कोणाला छेडत नाही मात्र कोणी छेडले तर त्याला सोडत नाही. यासाठी ज्यांनी रामाला आणले त्यांना आपण सत्तेवर आणा. डॉ. सुभाष भामरे यांना विजयी करा असे आवाहन करतांनाच त्यांनी मी तुम्हाला मतदानाचे आवाहन करण्याबरोबरच अयोध्याला दर्शनासाठी या हे सांगण्यासाठी आल्याचे सांगितले.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उमेदवार डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री दादा भुसे, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष निलेश कचवे, धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, खासदार अनिल बोंडे, आमदार मंगेश चव्हाण आदींची भाषणे झाली. सभेला खासदार अजित गोपछडे, आमदार जयकुमार रावल, आमदार दिलीप बोरसे, इंद्रदेव महाराज.
धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश निकम, राजेंद्र फडके, नारायण पाटील, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, डॉ. तुषार शेवाळे, सुरेखा भुसे, अजय भोळे, शैलेंद्र आजगे, निलेश माळी, सुनील गायकवाड, लकी गिल, मनीषा पवार, शेषराव पाटील, संजय भामरे, नितीन सोनवणे, राहुल सोनवणे.
श्रीधर कोठावदे, साहेबराव सोनवणे, संजय दुसाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, विजय देवरे, देवा पाटील, कमलेश निकम, समाधान हिरे, धनंजय पवार, किशोर इंगळे, सतीश पवार, मुकेश झुणझुणवाला, हरिप्रसाद गुप्ता, नंदू सोयगावकर, भरत पोफळे, राहुल पाटील, जयवंत पवार, राकेश भामरे, भारत जगताप, भारत चव्हाण, सुनील मोरे, दादा जाधव, संदीप पाटील आदी व्यासपीठावर होते. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.