V. N. Naik Institution Election : बिनविरोधचे आवाहन, एकाचीही नाही माघार!उद्यापर्यंत माघारीची मुदत

Nashik News : नाईक शिक्षण संस्‍था संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एकीकडे काही सभासदांचा आग्रह असताना दुसरीकडे माघारीच्‍या पहिल्‍या दिवशी गुरुवारी एकही उमेदवाराने माघार घेतली नाही.
V. N. Naik Institution
V. N. Naik Institutionesakal
Updated on

Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍था संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एकीकडे काही सभासदांचा आग्रह असताना दुसरीकडे माघारीच्‍या पहिल्‍या दिवशी गुरुवारी एकही उमेदवाराने माघार घेतली नाही. त्‍यामुळे सद्यःस्‍थितीत संचालक मंडळाच्‍या एकूण २९ जागांसाठी इच्‍छुकांची संख्या सुमारे चारशे आहे. (V. N. Naik Education Institution Election)

शनिवार (ता. १३)पर्यंत माघारीची मुदत असून, किती उमेदवार माघार घेतात, याकडे लक्ष लागून राहील. छाननीनंतर मंजूर नामनिर्देशांची संख्या ४२९ असून, यापैकी काही उमेदवारांनी एकापेक्षा जास्‍त जागांसाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्‍यामुळे प्रत्‍यक्षात इच्‍छुक उमेदवारांची संख्या सुमारे चारशेपर्यंत आहे. छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर गुरुवार (ता. ११)पासून माघारीच्‍या प्रक्रियेला सुरवात झाली; परंतु पहिल्‍या दिवशी एकाही उमेदवाराने माघारीसाठी अर्ज दाखल केला नाही.

शनिवार (ता. १३)पर्यंत माघारीची मुदत असल्‍याने पुढील दोन दिवस लगबग बघायला मिळणार आहे. सध्या तीन पॅनलची उभारणी जवळजवळ पूर्ण झालेली असून, चौथ्या पॅनलनिर्मितीसाठी घडामोडींना वेग आलेला आहे. निवडणुकीत चार पॅनल झाले तरी या माध्यमातून प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवारांची संख्या ११६ पर्यंत असेल. पहिल्‍या दिवशीचा प्रतिसाद पाहता फारसे उमेदवार माघारीसाठी इच्‍छुक नसल्‍याचे दिसत आहे.

अशात पॅनलकडून मनधरणी अयशस्‍वी झाल्‍यास यंदाच्‍या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्यादेखील मोठी राहण्याची दाट शक्‍यता आहे. दरम्‍यान, निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना दुसरीकडे समाजाच्‍या विविध व्‍हॉट्सअॅप ग्रुपवर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आवाहन करणारे संदेश व्‍हायरल होत आहेत. सभासदांकडून बिनविरोधचा आग्रह होत असताना इच्छुकांकडून निवडणुकीचा अट्टाहास धरला जातो आहे. (latest marathi news)

V. N. Naik Institution
V. N. Naik Institution Election : 3 पॅनल तयार; चौथ्याची चाचपणी! छाननीत 9 अर्ज बाद

सरचिटणीसपदाबाबत सस्पेन्स कायम

निवडणुकीत मातब्‍बर कुठल्‍या ठिकाणी कोणत्या पदासाठी निवडणूक लढविणार हे निश्‍चित असले तरी विश्‍वस्‍तपद व कार्यकारिणी सदस्‍यपदाकरिता उमेदवाराच्‍या नावाची घोषणा शनिवारी (ता. १३) माघारीच्‍या अंतिम दिवशी जाहीर करत झाकलेले पत्ते खुली होण्याची व्यूहरचना आहे. कोंडाजीमामा आव्‍हाड.

पंढरीनाथ थोरे, ॲड. तानाजी जायभावे या तिघांमध्ये अध्यक्षपदासाठी लढत होणार आहे. सरचिटणीस पदासाठी हेमंत धात्रक, बाळासाहेब सानप या दोन उमेदवारांची नावे समोर येत आहेत. आव्‍हाड यांच्‍या पॅनलमधून सरचिटणीसपदाचा उमेदवार कोण असेल याबाबत सस्‍पेन्‍स कायम आहे.

निवडणूक बिनविरोध करा : सोनवणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या व्‍यवस्‍थापन परिषदेचे माजी सदस्‍य विजय सोनवणे यांनीही निवेदन जारी करत बिनविरोध निवडणूक होण्याची अपेक्षा व्‍यक्‍त केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, क्लस्टर युनिव्‍हर्सिटीचे (समूह विद्यापीठ) आव्‍हान पेलण्यासाठी संस्थेची निवडणूक बिनविरोध होण्याची अपेक्षा व्‍यक्‍त केली.

V. N. Naik Institution
Nashik Tourist Places : विकेण्ड पावसाळी पर्यटनावर पोलिसांकडून निर्बंध! भावली, गंगापूर धरणासह त्र्यंबक परिसरात बंदोबस्त लावणार

शिक्षणपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील. प्रवाहाबरोबर चालत जाऊन बदल स्वीकारण्याशिवाय भविष्यात पर्याय नाही. थोर व्‍यक्‍तिमत्त्वाचा वारसा नाईक संस्‍थेला आहे. इच्छुकांची प्रचंड गर्दी पाहता निवडणुकीत सामाजिक, वैचारिक विभाजन होऊन कटुता निर्माण होऊन विकास प्रक्रियेला बाधा निर्माण होण्याचा धोका आहे.

यामुळेच काळाची व वेळेची निकड लक्षात घेता निवडणूक बिनविरोध होणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी वंजारी समाजातील ज्‍येष्ठ, जाणकार नेत्‍यांनी व धुरीणांनी पुढे येत संस्थेचे हित जोपासणाऱ्या ध्येयवादी अशा उच्चशिक्षित व संस्थेप्रति तळमळ आणि निष्ठा असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यासाठी प्रयत्‍न करावेत, अशी अपेक्षा सोनवणे यांनी व्‍यक्‍त केली.

V. N. Naik Institution
Nashik News : स्वेटरविक्रेत्या तिबेटींनी धरली उच्च शिक्षणाची कास; नाशिकमधील तिघे झाले डॉक्टर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.