V. N. Naik Institution Election : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत चार पॅनलमुळे अटीतटीची लढत बघायला मिळेल. यामुळे मातब्बरांकडून पॅनलच्या माध्यमातून सभासदांमध्ये प्रचार केला जात आहे. परंतु तेवढ्यावर अवलंबून न राहाता, स्वतःची यंत्रणा सक्रिय करताना वैयक्तिक स्तरावरून संपर्कावर भर दिला जात असल्याचे बघायला मिळत आहे. (Panel emphasis on personal touch with campaigning)
नाईक शिक्षण संस्थेच्या इतिहासात प्रथमच चौरंगी लढत होत असल्याने सर्व सभासदांचे, तसेच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्राचेही लक्ष या निवडणुकीकडे लागून आहे. या लढतीमध्ये प्रत्येक सभासदाच्या मताला मोल असणार आहे. त्यामुळे आकडेमोड करताना प्रत्येक मताची गोळाबेरीज करत उमेदवारांकडून ‘फिल्डिंग’ लावली जात आहे. सद्यःस्थितीत चारही पॅनल आपापल्या उमेदवारांसोबत सभा, बैठक, व्यक्तिगत भेटी घेताना सभासदांना गळ घालत आहेत.
परंतु इतक्यावर काम भागणार नसून, ही बाब लक्षात आल्याने उमेदवारांनी आपली वैयक्तिक यंत्रणा सक्रिय केली आहे. अनेक मातब्बरांकडून त्यांच्या नजीकच्या व्यक्तींकडून सभासदांना भेटून किंवा संपर्क साधताना मतदानासाठी गळ घातली जाते आहे. उमेदवाराच्या नावाची आठवण प्रथम करून देताना नंतर पॅनलसाठी मत मागितले जात आहे. (latest marathi news)
यंदा ‘त्या’ प्रचारात सक्रिय
निवडणुकीत महिला प्रतिनिधी पदासाठीच्या उमेदवार यापूर्वीपर्यंत प्रचारात सक्रिय राहायच्या; परंतु यंदा लढतीतील रंगत लक्षात घेता, उमेदवारांच्या कुटुंबातील महिला वर्गदेखील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात प्रचारात सक्रिय झाल्याचे बघायला मिळत आहे. आपल्या नात्यागोत्यांतील घरांमध्ये मुक्काम ठोकताना मतांचा बूस्ट देण्याचा प्रयत्न या महिलावर्गाकडून केला जातो आहे. काहींकडून दिवसभर फोनद्वारे संपर्क साधताना गप्पांच्या माध्यमातून छुपा प्रचार सुरू आहे.
सर्वच पॅनल ‘आस्ते कदम’
पॅनलची घोषणा होऊन चार दिवस उलटले असले तरी सर्वच पॅनलकडून प्रचारात ‘आस्ते कदम’ सुरू आहे. सद्यःस्थितीत आपल्या पॅनलसाठी मत देण्यासाठी सभासदांना गळ घातली जात असली तरी प्रतिस्पर्धींवर तोफा डागण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र प्रचाराच्या पुढील टप्प्यात आरोप-प्रत्यारोप, हेव्यादाव्यांची शक्यता टाळता येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.