V. N. Naik Institution Election : विक्रमी 12 तासांत लागणार निकाल! मतदानासाठी असतील 35 बूथ, 11 मतपत्रिका

Nashik News : व्‍ही. एन. नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या प्रांगणात २७ जुलैला मतदान होणार असून, ३५ बूथवर सभासद अकरा मतपत्रिकांवर शिक्‍का मारत संस्‍थेच्‍या नेतृत्‍वाची निवड करतील.
Naik Education Institute Election
Naik Education Institute Election esakal
Updated on

Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीत एकीकडे प्रचाराचा धुराळा उडत असताना, दुसरीकडे प्रशासकीय तयारी वेगाने सुरू आहे. गंगापूर रोडवरील व्‍ही. एन. नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या प्रांगणात २७ जुलैला मतदान होणार असून, ३५ बूथवर सभासद अकरा मतपत्रिकांवर शिक्‍का मारत संस्‍थेच्‍या नेतृत्‍वाची निवड करतील. (V. N. Naik Institution Election)

२८ जुलैला मतमोजणी होणार असून, यंदा विक्रमी बारा तासांत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. निवडणूक कार्यक्रमांतर्गत माघारी व चिन्‍हवाटपापर्यंत निवडणूक मंडळाचे कार्यालय इच्छुक व त्‍यांच्‍या समर्थकांनी गजबजले होते. पॅनलची घोषणा झाल्‍यानंतर सध्या कार्यालयातील वर्दळ कमी झाली असली तरी निवडणुकीची जोरदार तयारी निवडणुक मंडळाकडून सुरू आहे.

संस्‍थेच्‍या घटनेत नमूद केल्‍यानुसार गंगापूर रोडवरील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या प्रांगणात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. त्‍यामुळे जिल्‍हाभरातील सभासद शैक्षणिक संकुल गाठत मतदानाचा हक्‍क बजावतील. येत्‍या २७ जुलैला सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मतदानाची वेळ निश्‍चित केली आहे.

मतदान केंद्रस्‍थळी एकूण ३५ बूथ असून, गर्दी टाळण्यासाठी प्रत्‍येक बूथवर सुमारे अडीचशे सभासद मतदार मतदानाचा हक्‍क बजावतील, अशी व्‍यवस्‍था करण्यात आलेली आहे. २८ जुलैला सकाळी आठपासून मखमलाबाद लिंक रोडवरील भावबंधन मंगल कार्यालय येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. ऐरवी मतमोजणीसाठी अठरा ते चोवीस तासांचा वेळ लागत असतो. परंतु यंदा बारा तासांत निकाल जाहीर करण्याचा मनोदय निवडणूक मंडळाने व्‍यक्‍त केला आहे. (latest marathi news)

Naik Education Institute Election
Nashik Police : मनोरुग्ण महिलेसाठी उपनगर पोलिसांकडून मानवतेचे दर्शन! उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल

‘सहकार’चे कर्मचारी दिमतीला

मतमोजणीची प्रक्रिया गतिशीलपणे पार पडावी, यासाठी संस्‍थेच्‍या कर्मचाऱ्यांच्या जोडीला सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. त्‍यामुळे मतमोजणी जलद गतीने पूर्ण होईल, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला जात आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहचिटणीस, महिला प्रतिनिधी तसेच कार्यकारिणी सदस्‍यपदासाठी विविध तालुक्‍यांसाठीच्‍या एकूण अकरा मतमत्रिका असतील.

"मतमोजणी प्रक्रिया जलद गतीने व पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी यंदा संस्‍थेच्‍या कर्मचाऱ्यासह सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाईल. मतमोजणीसाठी साठ टेबल असतील. त्‍यामुळे बारा तासांमध्ये मतमोजणी पूर्ण करून निकाल जाहीर करण्यावर भर असेल. तत्‍पूर्वी मतदानाच्‍या दिवशी ३५ बूथ निश्‍चित केले आहेत." - ॲड. जालिंदर ताडगे, अध्यक्ष, निवडणूक मंडळ

Naik Education Institute Election
Nashik Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीची पेरणी; शरद पवार यांच्या उपस्थितीत आज निफाड येथे शेतकरी मेळावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.