V. N. Naik Institution Election : निवडणूक झाली, आता नावलौकिक वाढवा!

Election : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत बोगस मतदान, हाणामारी तसेच सभासदांना आर्थिक आमिषे यांसारख्या कथित घटनांमुळे यंदाची निवडणूक चांगलीच गाजली.
V. N. Naik Institution Election
V. N. Naik Institution Electionesakal
Updated on

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

V. N. Naik Institution Election : बहुजनांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत बोगस मतदान, हाणामारी तसेच सभासदांना आर्थिक आमिषे यांसारख्या कथित घटनांमुळे यंदाची निवडणूक चांगलीच गाजली. इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने कधी नव्हे, ती चार पॅनलची निर्मिती झाली. यात सत्ताधारी पंढरीनाथ थोरे यांच्या क्रांतिवीर विकास पॅनलला पूर्णपणे नाकारत, सरचिटणीस हेमंत धात्रक यांच्या हाती संस्थेची सूत्रे सोपविली आहे. (election was well known due to alleged incidents clashes)

मात्र, त्या जोडीला कोंडाजीमामा आव्हाड यांच्यावरही सभासदांना विश्वास दाखविला आहे. मिळालेला संमिश्र कौल स्वीकारून हातात हात घालून संस्थेचा नावलौकिक अधिकाधिक उंचविण्यासाठी काम करावे लागणार आहे. संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे पाच वर्षांपूर्वी नवीन चेहऱ्यांना घेऊन रिंगणात उतरले होते. त्या वेळी सभासदांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांना नाकारत हेमंत धात्रक, तानाजी जायभावे यांसह नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती. यात अनेक नवीन चेहरे जे संस्थेची फार निगडितदेखील नव्हते, ते संचालक झाले.

यामुळे निवडणुकीत उतरले की, निवडून येतो, असा समज झाला. परिणामी इच्छुकांची मोठी गर्दी या वेळी झाली. संस्था असो की समाज यात कुठूनही न दिसणाऱ्यांना पदाधिकारी, संचालकांचे स्वप्न पडू लागले. यातून नेत्यांना गळाला लावत, तुम्हीच, तुमच्याशिवाय कोणी नाही, असे बिंबवत उमेदवारी झाली. वास्तविक गत निवडणुकीत एकत्र असलेले आव्हाड व धात्रक यांनी एकत्र यावे, असा सभासदांचा सूर होता. मात्र, दोघांभोवती तयार झालेल्या इच्छुकांच्या गर्दीत त्यांना हा आवाज ऐकू गेला नसावा. यातूनच चार पॅनल तयार होऊन रिंगणात उतरले अन् आरोप-प्रत्यारोपांचे रणकंदन झाले.

थोरेंची भूमिका नापसंत

पाच वर्षांच्या कार्यकाळात अध्यक्ष थोरे यांनी एकाधिकारशाही गाजवत, संस्थेचा कारभार हाकल्याची ओरड दस्तुरखुद त्यांच्याच संचालकांची होती, तर दुसरीकडे संस्थेच्या नावलौकिकात भर घालेल, असे काम उभे राहिले नाही. त्यातूनच सभासदांची नाराजी वाढली. आर्थिक शिस्त लावत, काटकसर केल्याचा दावा त्यांनी केला. निवडून आल्यानंतर पुन्हा निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा त्यांनी स्वतः केली होती. मात्र, थोरे यांनी पुन्हा नवीन संवगड्यांची मोट बांधली. मात्र, सभासदांची नाराजी अन् काम नसल्याने सभासदांनी त्यांना नाकारले. (latest marathi news)

V. N. Naik Institution Election
V. N. Naik Institution Election : संस्थेच्या आवारात तणावाचे वातावरण; नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

आरोपांऐवजी कामाचा निर्धार

थोरे यांना नाकारत असताना सरचिटणीस धात्रक, तानाजी जायभावे यांच्या कामकाजावर सभासदांनी विश्वास दाखविला आहे. पाच वर्षांतील कामकाज बघता आव्हाड, धात्रक यांच्याकडे संस्था द्यायची, असा सूर सभासदांमध्ये होता. मात्र, दोघांभोवती झालेल्या गर्दीमुळे आव्हाड-धात्रक यांच्यात बिनसले. त्यानंतर धात्रक व जायभावे यांनी फार उशीर न करता नव्या-जुन्यांचा मेळ घालत पॅनल तयार केले अन् थेट सभासदांमध्ये जाऊन भिडले. यात, फारसे आरोप-प्रत्यारोप न करता आम्ही संस्थेत काय करणार, ही भूमिका मांडली. सभासदांना हीच भूमिका आश्वस्त वाटली अन् त्यांनी त्यांच्या झोळीत भरभरून दान टाकले.

हाणामारी, पैशांच्या आमिषाने डाग

कोंडाजीमामा आव्हाड यांनीही माजी आमदार बाळासाहेब सानप यांना सोबत घेत पॅनल दिले. मात्र, त्यास फार उशीर झालेला होता. या परिस्थितीत त्यांनी संस्थेच्या पाच वर्षांतील कामकाज लोकांसमोर मांडले. आव्हाड यांच्याबद्दल सहानुभूती होती. मात्र, कायम संस्थेच्या राजकारणापासून दूर असणाऱ्या सानप यांनी संस्थेत एकदम दाखविलेले स्वारस्य सभासदांना फारसे रुचले नाही.

यातच मतदानाप्रसंगी बोगस मतदान, हाणामारी या प्रकाराने संस्थेच्या नावलैकिकाला डाग लागला. सभासदांना दाखविण्यात आलेली आर्थिक आमिषेदेखील सभासदांनी आवडली नाहीत. सामाजिक अन्शै क्षणिक संस्थेत असे प्रकार घातक आहेत. त्यासाठी संस्थेत काम करणाऱ्यांनीही याचे भान ठेवण्याची गरज असून, वेळेत हे प्रकार रोखले पाहिजेत.

कौलाचा सर्वांनी विचार करावा

सर्व घडलेल्या घटनांनंतरही सभासदांनी दिलेला कौल विचार करायला लावणारा आहे. सभासद सर्वश्रेष्ठ असतात. त्यामुळे दिलेला हा कौल मान्य करत धात्रक आणि आव्हाड यांनी हेवेदावे, राजकारण न करता २०१४ ते २०१९ या कालावधीत संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी केलेल्या कामाची पुनरावृत्ती या पुढील पाच वर्षात करावी हीच सभासदांची अपेक्षा आहे.

V. N. Naik Institution Election
V. N. Naik Institution Election: शिक्षण संस्थेसाठी 81.77 टक्के मतदान; बोगस मतदान, हाणामारी प्रकाराने गोंधळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.