Nashik News : नाशिकमधूनही वंदे भारत रेल्वे! केंद्रीय मंत्री वैष्णव सकारात्मक; खासदार वाजेंनी मांडले नाशिकचे विविध प्रश्‍न

Latest Nashik News : नाशिकमधून थेट वंदे भारत सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली असून याबाबत वैष्णव यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले.
MP Rajabhau Waje in discussion with Union Railway Minister Ashwini Vaishnav.
MP Rajabhau Waje in discussion with Union Railway Minister Ashwini Vaishnav.esakal
Updated on

सिन्नर : नाशिक- पुणे महारेल मार्ग लागावी, नाशिक-कल्याण लोकल, नाशिक ते वाढवण बंदर त्र्यंबकेश्वरमार्गे नवीन मार्गांसह नाशिककरांच्या रेल्वेशी संबंधित विविध प्रलंबित प्रकल्प मार्गी लावावेत, अशी मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. नाशिकमधून थेट वंदे भारत सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली असून याबाबत वैष्णव यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले. (Vande Bharat Railway from city too MP waje raised various issues)

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे नाशिकमध्ये आले असता श्री. वाजे यांनी त्यांची भेट घेतली. नाशिककरांचे रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली. कोरोना काळात बंद झालेल्या नाशिककरांच्या जिव्हाळ्याच्या गाड्या आणि इतर जलद रेल्वेला बंद करण्यात आलेले थांबे पुन्हा सुरू करावेत आदी विषयांवर त्यांनी सकारात्मक चर्चा केली तसेच तसेच विविध मागण्या मांडल्या.

नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत खासदार वाजे यांनी मंत्री वैष्णव यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ती सकारात्ममक झाली. नाशिक- पुणे सेमी हाय स्पीड रेल्वेसंदर्भात विविध सकारात्मक चर्चा केली. हा मार्ग जुन्याच मार्गाने व्हावा, यामध्ये सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, चाकण ही गावे असून काही तांत्रिक अडचणी असल्यास त्या दूर कराव्यात.

त्याबाबत मागील तीन महिन्यांपासून श्री. वाजे यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे. श्री. वाजे यांनी पुन्हा या विषयाला गती देण्याबाबत मागणी केली. दरम्यान, नाशिक-पुणे सेमी हायस्पीड महारेल प्रकल्प जुन्याच मार्गाने होणार असल्याचे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी शिक्कामोर्तब केले. (latest marathi news)

MP Rajabhau Waje in discussion with Union Railway Minister Ashwini Vaishnav.
Latest Maharashtra News Updates : हरियाणातील लोकांनी इतिहास रचला, तिसऱ्यांदा कमळ फुलले": पंतप्रधान मोदींनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे स्वागत केले

मात्र या मार्गात नारायणगाव येथील रेडिओ दुर्बिणींचा अडसर आहे. १२३ देशांनी ही दुर्बिणींची मालिका तयार केली आहे. तेथून रेल्वेमार्ग टाकता येत नाही म्हणून हा प्रकल्प रखडला आहे. लवकरच हा प्रकल्प मार्गी लावला जाईल, असे वैष्णव यांनी स्पष्ट केले.

या आहेत प्रमुख मागण्या..

- नाशिक-पुणे सेमी हायस्पीड महारेल प्रकल्पाला गती

- नाशिकरोड स्थानकाची क्षमता वाढवणे आणि नूतनीकरण

- नाशिकरोड ते वाढवण बंदराला जोडणारा त्र्यंबकेश्वरमार्गे रेल्वेमार्ग

- नव्याने नाशिक ते पंढरपूर एकादशी एक्स्प्रेस

- नाशिकरोड येथून तिरुपती, जम्मू, अजमेरसाठी थेट रेल्वे

- रेल्वे ओव्हरहेड ब्रिज, अंडरपास नव्याने उभारणे

- 'पंचवटी' आणि 'राज्यराणी' ला पुनर्वैभव प्राप्त करून देणे

MP Rajabhau Waje in discussion with Union Railway Minister Ashwini Vaishnav.
Nashik News: समृद्धीवर शेतकऱ्यांना आंदोलनापासून रोखले! निळवंडे आवर्तन, देवनदीच्या पूरपाण्याच्या लाभापासून सायाळेकर वंचित राहणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.