Agriculture Startups : विद्यार्थ्यांना उमगल्या कृषी स्टार्टअप, फंडींगच्या विविध संधी

Nashik News : ‘सकाळ-ॲग्रोवन’ संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था एसआयआयएलसी, द-फार्म आणि के. के. वाघ कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ‘ॲग्रिकल्चर स्टार्टअप’ विषयावर कार्यशाळा आयोजिली होती.
With the attendees at the workshop held on Friday at K. K. Wagh Agricultural College Dr. S. M. Hadole, Dr. V. M. Shevlikar
With the attendees at the workshop held on Friday at K. K. Wagh Agricultural College Dr. S. M. Hadole, Dr. V. M. Shevlikaresakal
Updated on

Nashik News : अनेक विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपच्या संकल्पना स्पष्ट नसतात. स्टार्टअप कशाला म्हणायचे, आपल्या सुचलेल्या संकल्पनेतून स्टार्टअप कसा सुरू करावा, त्यासाठी त्याचे योग्य मार्केटिंग, ब्रॅण्डींग करण्याची पद्धती, फंडीग कुठून व कसे मिळवावे आणि शाश्वत व यशस्वी स्टार्टअपसाठी व्यवस्थापन कसे करावे आदी बाबींचा सविस्तर उलगडा येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना झाला. (Agriculture Startups)

‘सकाळ-ॲग्रोवन’ संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था एसआयआयएलसी, द-फार्म आणि के. के. वाघ कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. ५) ‘ॲग्रिकल्चर स्टार्टअप’ विषयावर डॉ पंजाबराव देशमुख येथील सभागृहात कार्यशाळा आयोजिली होती. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. हाडोळे अध्यक्षस्थानी होते.

सोबत डॉ. व्ही. एम. सेवलीकर, सहाय्यक प्राध्यापक तुषार उगले, एसआयआयएलसीचे सहसरव्यवस्थापक अमोल बिरारी, व्यवस्थापक स्वप्नील साखरे, द-फार्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश पोपळघट आणि मुख्य कार्यपालन अधिकारी सर्वेश घंगाळे आदी उपस्थित होते. कार्यशाळेत ॲग्री स्टार्टअप आयडिया, यशस्वी केस स्टडीज. (latest marathi news)

With the attendees at the workshop held on Friday at K. K. Wagh Agricultural College Dr. S. M. Hadole, Dr. V. M. Shevlikar
Nashik Dengue Update : जिल्ह्यात आतापर्यंत 79 रुग्णांना डेंगीची लागण! जूनमध्ये 28 डेंगींचे रुग्ण

ग्रांट आणि फंडींगच्या संधी तसेच प्रेझेंटेशन आणि प्रपोजल कसे बनवावे, व्यवसाय संदर्भात काही नवनवीन संकल्पना असल्यास त्या प्रत्यक्षात कशा आणाव्यात आदीबाबत द-फार्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश पोपळघट आणि मुख्य कार्यपालन अधिकारी सर्वेश घंगाळे यांनी सखोल मार्गदर्शन केले.

एसआयआयएलसीचे सहसरव्यवस्थापक अमोल बिरारी यांनी प्रास्ताविकात कार्यशाळा आयोजनाचा उद्देश तसेच पदवी पूर्ण केल्यानंतर पदवीधरांना कृषी क्षेत्रात असणाऱ्या संधी तसेच कृषी व्यवसाय व्यवस्थापन विषयांवर मार्गदर्शन केले. प्राध्यापक तुषार उगले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळेला विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक, शेतकरी तसेच लघु व मध्यम स्वरूपाचा व्यवसाय करणारे उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

With the attendees at the workshop held on Friday at K. K. Wagh Agricultural College Dr. S. M. Hadole, Dr. V. M. Shevlikar
Nashik News : उमेदवारी अर्ज विक्री, स्‍वीकृती आजपासून; नाईक शिक्षण संस्‍था निवडणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.