Nashik Vegetable Rate Hike : पालेभाज्या, फळभाज्याचे भाव वधारले; आवक घटल्याने परिणाम

Nashik News : वातावरणात बदल झाला असून परिणामी पालेभाज्या व फळभाज्यांची आवक सद्यःस्थितीत सुमारे वीस ते तीस टक्क्यांवर आली आहे.
vegetable price hike
vegetable price hikeesakal
Updated on

Nashik News : उन्हाचा तडाखा पुन्हा वाढला आहे. मध्यंतरी वळीवाच्या पाऊस देखील आला होता. यामुळे वातावरणात बदल झाला असून परिणामी पालेभाज्या व फळभाज्यांची आवक सद्यःस्थितीत सुमारे वीस ते तीस टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे बहुतांश पालेभाज्या व फळभाज्यांचे दर वधारले आहे. त्यामुळे गृहिणीचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. (Vegetable Rate Hike)

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून. पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत. बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल हा मुंबई, गुजरात अहमदाबाद कडे पाठविला जातो आणि काही प्रमाणात हा स्थानिक विक्रीसाठी व्यापारी खरेदी करत असतात. पालेभाज्या व फळभाज्यांची आवक सद्यःस्थितीत सुमारे वीस ते तीस टक्क्यांवर आली आहे.

यामुळे दर वधारले असून किमतीत वाढ झाली आहे. फळभाज्यामध्ये सध्या काकडी, शिमला यांची आवक आहे, मात्र, दोडका, कारले, गिलके आदी फळभाज्यांची आवक घटली आहे. बाजार समितीत रविवार (ता.१६) रोजी पार पडलेल्या लिलावात काकडी २५ ते ४९ रुपये किलो, दुधी भोपळा २४ ते २५ रुपये प्रतिकिलो, गिलके ५५ ते ७० रुपये किलो. (latest marathi news)

vegetable price hike
Nashik Police Station : शहरातील वर्दळीतल्या ‘पोलिस चौक्या’ नावालाच! बंद चौक्यामुळे तक्रारदारांची गैरसोय

कारले ७५ ते ८० रुपये प्रतिकिलो, दोडका ७५ ते ८५ रुपये प्रतिकिलो, शिमला मिरची ६५ ते ७५ रुपये प्रतिकिलो, हिरवी मिरची ७५ रुपये ते ९० प्रतिकिलो रुपये, वाल ८० प्रतिकिलो ते १०० रुपये प्रतिकिलो, गवार ४५ ते ५५ रुपये प्रतिकिलो, घेवडा १०० ते १२५ रुपये प्रतिकिलो, गाजर १५ रुपये ते २५ रुपये प्रतिकिलो, वांगी ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दर मिळाला.

किरकोळ विक्रेत्यांकडे हेच दर प्रतिकिलो तीस ते चाळीस रुपये वाढीव असतात. बाजार समितीत झालेल्या लिलावात गावठी कोथिंबीर २५ ते ८३ रुपये झूडी , मेथी १५ ते ३० रुपये झूडी, शेपू २५ ते ६५ रुपये झूडी, कांदापात २० ते ते १०५ रुपये झूडीला भाव मिळत आहे. तेच किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात यांची झूडी छोटी करून डबल बाजार भावाने विक्री होत आहेत.

vegetable price hike
Nashik News : 'स्वाभिमानी शेतकरी'चा बारामतीतून एल्गार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.