Nashik Police: शहर पोलीस आयुक्तालयाचा वाहन ताफा झाला ‘तगडा’! पालकमंत्र्यांनी दाखविला हिरवा झेंडा; DPDCतून मिळाली 110 वाहने

Nashik News : नाकाबंदी कामी ३०० नवीन बॅरिकेटस्‌ही उपलब्ध झाली असून, नवीन वाहनांना पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
Guardian Minister Dada Bhuse flagging off the fleet of new vehicles. Along with Commissioner Sandeep Karnik and others.
Guardian Minister Dada Bhuse flagging off the fleet of new vehicles. Along with Commissioner Sandeep Karnik and others.esakal
Updated on

Nashik Police : नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना वाहन गस्त महत्त्वाची असते. त्याच अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाच्या वाहन ताफ्यामध्ये नव्याने ६८ चारचाकी वाहने व ४८ दुचाकी वाहनांचा समावेश झाला आहे. तसेच, नाकाबंदी कामी ३०० नवीन बॅरिकेटस्‌ही उपलब्ध झाली असून, नवीन वाहनांना पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. (vehicles of City Police Commissionerate upgraded)

पोलीस आयुक्तालयास दाखल होणाऱ्या नवीन वाहनाची पूजा करताना पालकमंत्री दादा भुसे. समवेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक.
पोलीस आयुक्तालयास दाखल होणाऱ्या नवीन वाहनाची पूजा करताना पालकमंत्री दादा भुसे. समवेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक.esakal

गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयात नवीन वाहनांचा ताफा आयुक्तालयाच्या वाहन ताफ्यात समाविष्ठ करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते मुख्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते वाहनांची पूजा करण्यात आली. तसेच, वाहनांना हिरवा झेंडाही दाखविला.

यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त संदीप मिटके, शेखर देशमुख, सुधाकर सुराडकर यांच्यासह अजय बोरस्ते, विजय करंजकर, प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप मिटके यांनी केले तर उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी आभार मानले. (latest marathi news)

Guardian Minister Dada Bhuse flagging off the fleet of new vehicles. Along with Commissioner Sandeep Karnik and others.
Nashik Police Transfer: बदल्या झालेले अधिकारी हजर होईना! कामांचा होतोय खोळंबा; महासंचालक कार्यालयाकडून सूचना

* जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राप्त वाहने

- स्कॉर्पिओ : १०

- बोलेरा : ४०

- बोलेरो न्युओ : ८

- इनोव्हा : २

- थार : १

- एक्सयुव्ही ७०० : १

- मोपेड ज्युपिटर : २५

- बॅरिकेटस् : ३००

* पोलिस महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त वाहने

- दुचाकी हिरो एक्सस्ट्रीम : २०

- दुचाकी टीव्हीएस : ३

Guardian Minister Dada Bhuse flagging off the fleet of new vehicles. Along with Commissioner Sandeep Karnik and others.
Nashik Police : सरकारी पाट्या लावणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा! शहर पोलिसांकडून पावणे दोनशे वाहनांवर दंडात्मक कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.