पंचवटी : येथे भररस्त्यात वाहने पार्किंगचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला आहे. वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. त्यामुळे छोटे- मोठे अपघात नित्याचे झाले आहे. काही महिन्यांपूर्वी एका अपघाताचे प्रत्यक्षदर्शीने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांमुळेदेखील अपघात होतात हे प्रकर्षाने मांडले होते. याकडे वाहतूक पोलिस लक्ष केंद्रित करणार का, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. (Nashik Vehicle Parking on Panchvati Road marathi news)
प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी आहे. त्यामुळे पंचवटीत भाविकांची वर्दळ सुरू असते. दिंडोरी रोडवर वाहनाची वर्दळीचे प्रमाणात दिवसागणिक वाढ झाली आहे. पंचवटी ते म्हसरूळ गावापर्यंत या मार्गावर मुख्य मार्गावर पंचवटी कारंजा येथील परिसर, दिंडोरी नाका, आरटीओ कॉर्नर, अमित वाइन, स्टेट बँक ऑफ इंडिया, आकाश पेट्रोलपंप, दिंडोरी वाइन शॉप, अमित वाइन शॉप, स्टेट बँक ऑफ म्हसरूळ पोलिस चौकी जवळील बँक ऑफ इंडिया, या ठिकाणी रस्त्यावर पार्क केलेली वाहन नेहमीच असतात.
त्यात मुख्य मार्गावर लगत पादचारी मार्ग आहे. यालगत अनेक वाहनचालक आपली वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रकार वाढले असून, पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन मार्ग शोधावा लागत आहे. मध्यंतरी काही प्रमाणात अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्यात आला होता. (latest marathi news)
परंतु, काही दिवसातच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यामुळे याकडे संबंधितांनी विभागाने लक्ष देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
"अनेक वाहनचालक मुख्य रस्त्यावर वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, पादचारी नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय पार्किंगसाठी जागा नसल्याने अडचणीत वाढ होत आहे. याकडे संबंधित वाहतूक पोलिस लक्ष देऊन शहरातील समस्या सोडवाव्यात."
-विशाल बेंडकुळे, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.