Nashik News: वाहन ट्रान्सपोर्ट क्षेत्राला मिळणार बूस्ट! देवळाली ते चंडीगड पहिला ऑटोमोबाईल रेक 24 वाहनांसह रवाना

Nashik News : रेल्वेच्या पार्सल विभागाने देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनहून ऑटोमोबाईलचा महिंद्रा अँड महिंद्राचा एनएमजी पहिला रेक रवाना केला आहे.
Railway officials and staff loading four-wheelers from Deolali Camp Railway Station to Chandigarh.
Railway officials and staff loading four-wheelers from Deolali Camp Railway Station to Chandigarh.esakal
Updated on

नाशिक रोड : रेल्वेच्या पार्सल विभागाने देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनहून ऑटोमोबाईलचा महिंद्रा अँड महिंद्राचा एनएमजी पहिला रेक रवाना केला आहे. चारचाकी वाहन पाठविण्याच्या या अभिनव उपक्रमामुळे नाशिकच्या ऑटोमोबाईल सेक्टरला ऊर्जितावस्था मिळेल, असे उद्योजक, व्यापारी आणि नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ञांनी मध्य रेल्वेचे आणि देवळाली कॅम्प रेल्वेस्टेशनचे आभार मानले आहेत. (Nashik vehicle transport sector marathi news)

देवळाली कॅम्प रेल्वेस्टेशन येथून पहिल्यांदाच महिंद्रा आणि महिंद्राने रेक लोड केला आहे. याआधी ही वाहने मोठ्या कंटेनरने रस्त्याने पाठवली जायची. आता देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनवरून स्वतंत्र चारचाकी वाहने लोड करण्याची सुविधा करण्यात आली आहे.

नाशिकपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवळालीचे रूपांतर एका उत्कंठावर्धक अमृत भारत स्टेशनमध्ये झाले आहे. देवळाली कॅम्प येथून एनएमजी रेकमध्ये ऑटोमोबाईल लोडिंग सुरू करून ऑटोमोबाईल क्षेत्राला ऊर्जितावस्था दिली आहे. (Latest Marathi News)

Railway officials and staff loading four-wheelers from Deolali Camp Railway Station to Chandigarh.
NMC Hoarding Case: खासगी जागेतील होर्डिंगधारकांना न्याय मिळवून देवू; घोटाळ्याच्या चौकशीचे उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन

यामुळे लहान-मोठ्या उद्योजकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून चारचाकी वाहन पाठविण्याच्या या अभिनव उपक्रमामुळे रेल्वेचा महसुलाबरोबरच कनेक्टिव्हिटीला उत्तम पर्याय निर्माण झाला आहे. शिवाय रस्त्यावरचा लोड कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होणार आहे. महिंद्रा आणि महिंद्राच्या रविवारी (ता.१८) देवळाली येथून स्कॉर्पिओ क्लासिक आणि थार ही वाहने चंडीगडला रवाना केले आहेत.

Railway officials and staff loading four-wheelers from Deolali Camp Railway Station to Chandigarh.
Nashik News : घरूनच टपाली मतदानाची 80 वर्षांवरील मतदारांना सुविधा! जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घेतला आढावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.