Nashik: वेलजाळी यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित! 12 ऑक्टोबरचा अल्टिमेटम; पोलिस अन मित्रांच्या विनंतीवरून तात्पुरती माघार

Latest Nashik News : येत्या बारा ऑक्टोबरनंतर आपण उपस्थित केलेल्या मागण्यांसंदर्भात योग्य ती कार्यवाही न झाल्यास पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू केले जाईल असे वेलजाळी यांनी म्हटले आहे. (
Deepak Veljali along with barber Dilip Patil while suspending the food boycott movement by taking lemonade from Naib Tehsildar Sagar Mundada.
Deepak Veljali along with barber Dilip Patil while suspending the food boycott movement by taking lemonade from Naib Tehsildar Sagar Mundada.esakal
Updated on

सिन्नर : सिन्नर- शिर्डी महामार्गावर पिंपरवाडी टोलप्लाझा येथे धरणे आंदोलन व तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख दीपक वेलजाळी यांनी प्रकृती बिघडल्यामुळे व अधिकाऱ्यांनी विनंती केल्यामुळे उपचारासाठी त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. येत्या बारा ऑक्टोबरनंतर आपण उपस्थित केलेल्या मागण्यांसंदर्भात योग्य ती कार्यवाही न झाल्यास पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू केले जाईल असे वेलजाळी यांनी म्हटले आहे. (Veljali food giving up movement suspended)

महामार्ग प्रकल्पाच्या कामावर दैनंदिन सफाईचे काम करणाऱ्या मजुरांच्या वाहनाला अपघात होऊन दोन मजूर ठार झाले होते. जखमींवर शस्त्रक्रिया झाल्या. कामगार आयुक्तांमार्फत या घटनेची चौकशी करावी, अपघातास कारणीभूत एजन्सीविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी वेलजाळी यांची होती.

महामार्ग प्रकल्पाच्या टप्प्यात येणाऱ्या अतिक्रमणांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. महामार्गापासून सुरू केलेल्या धरणे आंदोलनाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सपशेल दुर्लक्ष केले होते. मात्र तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केल्यानंतर मात्र प्रशासन जागे झाले.

सोमवारी नायब तहसीलदार सागर मुंदडा, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता दिलीप पाटील, वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांनी दुपारी दोनपासून वेलजाळी यांना उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार वेलजाळी यांच्या शरीरातील साखरेची पातळी खाली आली होती. (latest marathi news)

Deepak Veljali along with barber Dilip Patil while suspending the food boycott movement by taking lemonade from Naib Tehsildar Sagar Mundada.
Maharashtra Assembly Elections: महाविकास आघाडीत जागावाटपावर तिढा! २४० ते २५० जागांवर सहमती, इतर जागांचं काय?

त्यांचा रक्तदाबही वाढला होता. त्यामुळे उपचार घेण्यास नकार देणाऱ्या वेलजाळी यांना जागेवर सलाईन लावण्यात आली. सहाय्यक निरीक्षक शिंदे, वेलजाळी यांच्या मित्रपरिवाराने विनंती केल्यानंतर त्यांनी अन्नत्याग आंदोलन तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेतला. अधिकाऱ्यांकडून कोणतेही पत्र स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.

अधिकाऱ्यांचेच राजकारण

राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून किती अतिक्रमणधारकांना नोटीस दिल्या, याबाबत अधिकृत खुलासा करण्यात आला नाही. वावी गावातील एका विशिष्ट अतिक्रमणाबाबत अधिकारी बोलत होते. मात्र आपण दिलेल्या अर्जात वैयक्तिक अतिक्रमणधारकाचा उल्लेख नसताना देखील अधिकारी जाणीवपूर्वक त्याच अतिक्रमणाबाबत सांगत असून हा जाणीवपूर्वक भांडणे लावण्याचा प्रकार असल्याचा आरोप वेलजाळी यांनी केला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी त्यांची जबाबदारी झटकण्यासाठी स्थानिक पातळीवर दोन गटांमध्ये वाद निर्माण करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Deepak Veljali along with barber Dilip Patil while suspending the food boycott movement by taking lemonade from Naib Tehsildar Sagar Mundada.
Nashik News : येवल्याच्या बाजारात 248 घोड्यांची विक्री! पांढरा मारवाड अडीच तर घोडी दीड लाखांना, देशभरातून शौकीन दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.