Nashik News : ज्येष्ठ कीर्तनकार रामनाथ महाराज यांचे वारीमार्गावर अहिल्यानगरात निधन

Nashik News : वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार रामनाथ महाराज भगवंत शिलापूरकर (वय ८०) यांचे बुधवारी (ता.३) पहाटे ४:१५ वाजता अहिल्यानगर (अहमदनगर) येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
Senior Kirtankar Ramnath Maharaj
Senior Kirtankar Ramnath Maharajesakal
Updated on

माडसांगवी : वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार रामनाथ महाराज भगवंत शिलापूरकर (वय ८०) यांचे बुधवारी (ता.३) पहाटे ४:१५ वाजता अहिल्यानगर (अहमदनगर) येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुख, नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ कीर्तनकार रामनाथ महाराज शिलापूरकर सालाबादप्रमाणे यंदाही असंख्य वारकऱ्यांसह श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून दिंडी घेऊन श्रीक्षेत्र पंढरपूरकडे वाटचाल करीत होते. (kirtankar Ramnath Maharaj passed away)

संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज जन्मोत्सवाचे ७५१ वर्ष असल्याने श्रीक्षेत्र अहिल्यानगर (अहमदनगर) या ठिकाणी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा रथ आणि दिंडी सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामी थांबला असता बुधवारी (ता.३) प्रदोष दिनी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी दिनीच रामनाथ महाराज हे हरिनाम जप करीत असतानाच समाधिस्थ झाले.

यावेळी संत निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टच्या अध्यक्षा कांचन जगताप यांनी त्यांना दवाखान्यात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. एका ज्येष्ठ वारकऱ्याच्या असे देहावसान होणे म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्म आणि कार्याची फलश्रुतीच असल्याची प्रतिक्रिया भाविकांमधून उमटली. (latest marathi news)

Senior Kirtankar Ramnath Maharaj
Nashik ZP News : जि. प. कर्मचारी बँकेची रविवारी वार्षिक सभा

साधारण १९७३ च्या दशकात बाबांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे यादव महाराज रेडगावकर यांचे शिष्यत्व स्वीकारून सुमारे ३५ वर्ष म्हणजे आजतागायत नाशिक जिल्ह्यातील गावागावात अखंड हरिनाम सप्ताहाची मुहूर्तमेढ रोवून या सप्ताहांना अखंडपणे उपस्थिती दर्शविली. गावागावात हजारो वारकरी, गायक, वादक, कीर्तनकार घडविले.

वारकरी संप्रदायातील एका महान नेतृत्वाने पंढरपूर वारीच्या पर्वकाळात वारीमार्गावरच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर श्रीक्षेत्र शिलापूर येथे अंतिम संस्कार करण्यात आले. याप्रसंगी शेकडो वारकऱ्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पंचक्रोशीतील तमाम सांप्रदायिक मंडळ उपस्थित होते. बाबांच्या पश्चात राजेंद्र, विजय, दीपक, ज्ञानेश्वर कहांडळ अशी चार मुले आणि दोन मुली असा परिवार आहे.

Senior Kirtankar Ramnath Maharaj
Nashik Onion News : नाफेड, ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीत व्यापारी मालामाल; खरेदीप्रक्रियेत सुचवला बदल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.