नाशिक : विधानसभा निवडणुकीत शासकीय कर्मचारी, ८५ वर्षांवरील वयोवृद्ध मतदार आणि दिव्यांग अशा एकूण १४ हजार मतदारांनी आतापर्यंत टपाली मतदान केले आहे. जिल्ह्यात साधारणत: ३६ हजार मतदार आहेत. विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तत्पूर्वी ८५ वर्षांवरील वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मतदान केंद्रावर ज्याप्रमाणे मतदान पथक रवाना होते, अगदी त्याचप्रमाणे नाशिक पूर्व मतदारसंघात गृहमतदानाच्या प्रक्रियेस बुधवारी (ता. १३) सकाळी सुरुवात झाली. (14 thousand postal voters exercised their right )