Nashik Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षाकडून सुरू असलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेसकडून मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघासाठी चार नावे बंद पाकिटामध्ये पाठविण्यात आली आहेत. चारपैकी कोणाला उमेदवारी मिळेल हे गुलदस्त्यात असले तरी चार नावांमध्ये पक्षातील निष्ठावंतांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Vidhan Sabha Election 2024 4 names from Congress)
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व महायुतीकडून सर्वेक्षण व मुलाखतींचा सिलसिला सुरू झाला आहे. मुलाखतींमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. काँग्रेसकडून जिल्ह्यातील सात जागांवर दावा केला असला तरी सर्वाधिक लक्ष मालेगाव मध्य व नाशिक मध्य या दोन मतदारसंघांवर आहे.
त्याचबरोबर इगतपुरी, चांदवड- देवळा या मतदारसंघांकडेदेखील काँग्रेसचे विशेष लक्ष आहे. नाशिकचे प्रभारी आमदार कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाच सप्टेंबरला काँग्रेस भवनमध्ये मुलाखती झाल्या. १५ मतदारसंघासाठी तब्बल ६५ जणांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. इच्छुकांमध्ये बाहेरील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचादेखील समावेश होता.
यातील काही नावे समोर आली, मात्र काही नावे उघड झाली नाही. पक्षश्रेष्ठींकडे इच्छुकांचे अहवाल पाठविण्यात आले आहे. लोकशाही पद्धतीने या नावांवर विचार होऊन काँग्रेस वर्किंग कमिटीकडे पाठविले जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी दिली. इच्छुकांमधूनच उमेदवारी जाहीर केली जाणार आहे. (latest marathi news)
निष्ठावंतांचा समावेश
नाशिक शहरातील चारपैकी मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून चार नावे बंद पाकिटामध्ये वरिष्ठांकडे पाठविण्यात आली आहेत. इतर पक्षातील नेत्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाठविण्यात आलेले चार नावे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्यांची आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची तयारी करण्यात आली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत मतदारांचा कल लक्षात घेऊन काँग्रेसकडून मध्य विधानसभा मतदारसंघासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.