Nashik Vidhan Sabha Election 2024: बागलाणमध्ये नणंद विरूद्ध भावजय सामना! गीतांजली गोळे-पवार यांनी राष्ट्रवादीकडून मागितली उमेदवारी

Latest Vidhan Sabha Election News : माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार या बागलाणमध्ये भाजपकडून उतरण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांची नणंद गीतांजली गोळे-पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे मुलाखत देवून उमेदवारी मागितली आहे.
Dr. Bharati Pawar
Dr. Bharati Pawaresakal
Updated on

Nashik Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री (स्व.) ए. टी. पवार यांच्या कुटुंबाचे झालेले मनोमिलन आता विधानसभा निवडणुकीत दुभंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार या बागलाणमध्ये भाजपकडून उतरण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांची नणंद गीतांजली गोळे-पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे मुलाखत देवून उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे या मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगण्याची शक्यता आहे. (Vidhan Sabha Election 2024 Baglan Geetanjali Gole Pawar sought nomination from NCP)

जिल्ह्याच्या राजकारणात (स्व.) ए. टी. पवार यांचे कुटुंब सर्वश्रुत आहे. त्यांचे सुपुत्र नितीन पवार हे कळवणचे आमदार असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून दावेदारी केली आहे. नितीन पवार यांची पत्नी जयश्री पवार या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिल्या आहेत.

(स्व.) ए. टी. पवारांच्या पश्‍चात त्यांचा राजकीय वारसा नितीन व जयश्री यांच्या रूपाने सुरु असताना डॉ.भारती पवार यांची राजकारणात ‘एन्ट्री’झाली. सलग दोन वेळा जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आलेल्या डॉ.पवारांना थेट खासदार होण्याची संधी मिळाली. (latest marathi news)

Dr. Bharati Pawar
Vidhan Sabha Election : धुळ्यात गरब्याभोवती ‘राजकीय रिंगण’; विधानसभा निवडणुकीमुळे नवरात्रोत्सवाचा माहोल ‘कॅच’

विशेष म्हणजे अडीच वर्षातच त्यांना मंत्रिपद मिळाल्याने जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार ते मंत्री असा त्यांचा राजकीय आलेख राहिला. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता पुढील राजकीय दिशा निवडण्यासाठी त्यांनी बागलाणचा पर्याय समोर ठेवलेला दिसतो. त्यांना भाजपकडून उमेदवारीची अपेक्षा आहे.

तर त्यांची नणंद जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य गीतांजली पवार यांनी याच मतदारसंघासाठी सोमवारी (ता.७) त्यांनी पुण्यात मुलाखत देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. गत विधानसभा निवडणुकीतही त्यांनी या मतदारसंघातून उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, त्यात अपयश आले. आतातरी पवार कुटुंबाला या मतदारसंघात उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा लागून आहे.

Dr. Bharati Pawar
Vidhan Sabha Election: तळोदा-शहादा मतदारसंघातून इच्छुकांची संख्या जास्त; कोणत्या पक्षाकडून कोणाची लॉटरी लागते याकडे जिल्ह्याचे लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.