Vidhan Sabha Election 2024 : नवं सूत्र अवलंबिताना चांदवडच्या भाजप बैठकीत खडाजंगी! उमेदवारी देताना लागणार वरिष्ठांचा कस

Latest Vidhan Sabha Election 2024 News : चांदवड - देवळा विधानसभेची उमेदवारी जाहीर करताना वरिष्ठांचा कस लागणार आहे. चांदवडला शासकीय विश्रामगृहावर काल झालेल्या बैठकीनंतर चांदवड भाजपमध्ये विषय पुढे आला.
Vidhan Sabha Election 2024 BJP
Vidhan Sabha Election 2024 BJPesakal
Updated on

गणूर : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी हाकेच्या अंतरावर असताना कार्यकर्त्यांचा ' आवाज ' काय म्हणतोय यासाठी भाजपने नवं सूत्र अवलंबिले आहे. याचीच अंमलबजावणी करताना भाजप चांदवड बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे चांदवड - देवळा विधानसभेची उमेदवारी जाहीर करताना वरिष्ठांचा कस लागणार आहे. चांदवडला शासकीय विश्रामगृहावर काल झालेल्या बैठकीनंतर चांदवड भाजपमध्ये विषय पुढे आला. (Clashes in Chandwad BJP meeting)

भाजपकडून मतदार संघाचा आढावा सुरू आहे. भाजपचे आमदार कनुभाई पटेल पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून गोपनीय अहवाल घेऊन गेले. युती, आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांचे स्थान काय या लोकप्रश्नाला उत्तर देताना उमेदवारी देण्याचा प्रक्रियेत भाजपने कार्यकर्त्यांना अप्रत्यक्ष सहभागी करून घेताना, क्रियाशील कार्यकर्त्यांकडून बंद लिफाफ्यात विधानसभा उमेदवारीसाठी पात्र तीन उमेदवारांची नावे पक्षाने घेण्याचं ठरवलं.

हिचं प्रक्रिया आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ, महामंत्री आनंद शिंदे, सचिन दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदवड येथे पार पडणार होती. मात्र, या गोपनीय प्रक्रियेत भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनाच डावलल्याचे लक्षात येताच त्यांनी चांगलेच तिखट प्रश्न उपस्थित केले. मतदान करण्यासाठी ठरलेली यादी मॅनेज आहे का असा थेट प्रश्न प्रशांत ठाकरेंसह काही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केल्यावर बैठकीत तणाव निर्माण झाला. (latest marathi news)

Vidhan Sabha Election 2024 BJP
Maharashtra Assembly Election 2024: मोठी बातमी! संघ थेट प्रचारात उतरणार? ७० दिवसांचा मेगा प्लॅन रेडी; पण फायदा कुणाला?

दरम्यान या राजकीय स्पर्धेला केदा आहेर यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमापासून सुरवात झाली आहे. डॉ. राहुल आहेर पहिल्यांदा आमदार होताना 'बाबांची' इच्छा तर दुसऱ्यांदा भावाला मिळणारं मंत्रिपद बघता केदा आहेरांनी आमदारकीच्या महत्त्वाकांक्षांना मुरड घातली. आता दादा परतफेड करतील अशी अपेक्षा वजा हट्ट केदा आहेर यांनी अभीष्टचिंतन सोहळ्यात व्यक्त केला. उत्तर देताना आमदार आहेर यांनी अतिशय मुत्सद्दी भाषण ठोकले.

अशा पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या बैठकीत जो गदारोळ झाला तो प्रामुख्याने नाना अन् दादांच्या कार्यकर्त्यांत होता. नानांचा भेटीगाठींचा वेग अन् दादांनी चांदवड मध्ये निर्माण केलेली कार्यकर्त्यांची मोठी फळी दोन्ही गोष्टी बघता इथे उमेदवारी जाहीर करताना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा कस लागणार आहे. पण तूर्तास तरी भाजपमध्ये बंद लिफाफ्याच चांदवडला चांगलंच रंगले आहे.

Vidhan Sabha Election 2024 BJP
Amit Shah: अमली पदार्थ तस्करीत काँग्रेसशी संबंधित व्यक्ती; गृहमंत्री अमित शहांकडून टीकास्त्र!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.