नांदगाव : आचारसंहितेची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच राज्यात सत्तारूढ गटाकडून राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर नियुक्तीबाबत हालचाली गतिमान झाल्या आहेत. माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या नावाचा या संभाव्य यादीत समावेश होणार असल्याच्या घडामोडींमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटले आहेत.
महायुतीकडून नांदगाव मतदारसंघावर दावा करणाऱ्या भुजबळ कुटुंबीयांचे अशा पद्धतीने राजकीय पुनर्वसन झाल्याने नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्यासमोरील निवडणुकीतील अडथळा दूर झाल्याची चर्चा या घडामोडींनंतर सुरू झाली आहे. (Nashik Vidhan Sabha Election 2024 Mahayuti found solution to kande vs Bhujbal dispute)
नांदगाव विधानसभेच्या जागेवर सलग दोन वेळा विजयी झाल्याने ही जागा महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल, असा दावा भुजबळ समर्थकांकडून केला जात होता. गेल्या महिन्यात शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः आमदार सुहास कांदे यांच्या विधानसभेतील फेरउमेदवारीची अप्रत्यक्ष घोषणा केली.
त्यानंतर सणोत्सवानिमित्त माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नावाची मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झाली होती. याशिवाय, सांस्कृतिक कार्यक्रमातून समीर भुजबळ यांचे हजेरी लावणे सुरू होते. त्यातच आपल्याविरोधात पंकज-समीर यांच्याऐवजी थेट मोठ्या भुजबळांनी निवडणूक लढवावी, असे प्रतिआव्हान देत आमदार कांदे यांनी पक्षाने आदेश दिल्यास आपण येवल्यातूनही निवडणूक लढवू, असा इशारा दिला होता. (latest marathi news)
त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुजबळ-कांदे असा राजकीय ट्विस्ट तयार झाला होता. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सोहळ्यात स्वतः मंत्री छगन भुजबळ यांनी निवृत्तीचे संकेत देत पंकज-समीर यांना पुढील वाटचालीस जनतेने शुभेच्छा द्याव्यात, असे भावनिक आवाहन केले होते. त्यात अनेक संकेत दडले होते.
आज पंकज भुजबळ यांच्या विधान परिषदेवरील संभाव्य समावेशामुळे छगन भुजबळ यांना अभिप्रेत असलेल्या गोष्टी व योग मात्र जुळून आला आहे. भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी या महायुतीच्या राज्यस्तरीय वरिष्ठांनी या विवादावर तोडगा म्हणून नांदगावचे माजी आमदार पंकज भुजबळ यांचा विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्तीचा मधला मार्ग काढला. त्यामुळे नांदगाव मतदारसंघापुरता निर्माण झालेला विवाद, त्यातून बदलणारी समीकरणे, कांदे-भुजबळ विवादाला लगाम लावण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.