Nashik Vidhan Sabha Election 2024 : नाशिककरांचा कौल कोणाला मिळणार?

Political News : २०२४ च्या निवडणुकीत महायुती हाच सिलसिला कायम राहील का किंवा त्याला छेद देऊन नाशिककर कोणाच्या बाजूने कौल देतात याचीच उत्सुकता ताणली गेली आहे.
Sharad Pawar, Uddhav Thackeray, Nana Patole, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Sharad Pawar, Uddhav Thackeray, Nana Patole, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shindeesakal
Updated on

सिडको : नाशिकचे मतदार सुज्ञ आणि अभ्यासू आहेत. कुणाचा कधी पत्ता कट करायचा आणि कुणाला निवडून देणार याचा थांगपत्ता ते शेवटपर्यंत कुणालाच लागू देत नाही. विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर नाशिकच्या तीन मतदारसंघात प्रत्येकवेळी एकाच पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचा करिष्मा नाशिककरांनी घडवला आहे.

विभाग पडल्यानंतर प्रथम २००९ मध्ये नाशिककरांनी मनसेचे तीन उमेदवार निवडून दिले होते. तर त्यानंतरच्या २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या तिन्ही उमेदवारांना निवडून देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळेच २०२४ च्या निवडणुकीत महायुती हाच सिलसिला कायम राहील का किंवा त्याला छेद देऊन नाशिककर कोणाच्या बाजूने कौल देतात याचीच उत्सुकता ताणली गेली आहे. (Nashik Vidhan Sabha Election 2024 Who will get vote)

२००९ च्या निवडणुकांमध्ये मनसे हा नवखा पक्ष होता. राज ठाकरे यांचा प्रभाव नाशिककरांवर होता. परंतु नाशिककर मनसेच्या पारड्यात तिन्ही जागा टाकतील अशी भविष्यवाणी त्या वेळी कोणी केली असती तर लोकांनी त्याला निश्चितच वेड्यात काढले असते. परंतु करिष्मा काय असतो हे नाशिककरांनी अनुभवले.

यानंतर २०१२ मध्ये झालेल्या नाशिक महापालिका निवडणुकीतही मनसेने १२२ पैकी ४० जागा जिंकून महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष बहुमान मिळवला २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र मनसेची ही जादू चालली नाही. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या त्सुनामीत मनसेसह अनेक पक्षांच्या दिग्गज उमेदवारांचा सुपडा साफ झाला.

नाशिककरांनी या वेळी भाजपच्या तिन्ही उमेदवारांच्या पारड्यात आपली मते टाकली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही नाशिककरांनी पुन्हा भाजपच्या तिन्ही उमेदवारांना निवडून देऊन एकाच पक्षाच्या बाजूने कौल देण्याची आपली परंपरा कायम राखली. तत्पूर्वी २०१७ मध्ये झालेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत नाशिककरांनी १२२ पैकी ६६ जागा भाजपच्या पारड्यात टाकून या पक्षाला एक हाती सत्ता बहाल केली होती. (latest marathi news)

Sharad Pawar, Uddhav Thackeray, Nana Patole, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Vidhan Sabha Election: क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेल्या आमदाराला पुन्हा लढायचयं! 'या' पक्षाकडे मागितली उमेदवारी

आता मात्र पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. त्यामुळे २०२४ ची विधानसभा निवडणूक म्हणजे महाविकास आघाडी, महायुतीच्या दृष्टीने एक प्रकारे लिटमस टेस्टच ठरणार आहे.

जागावाटप प्रक्रिया होईल क्लिष्ट

महाआघाडीतर्फे काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्ष नाशिकमधील प्रत्येक मतदारसंघांवर आपला दावा ठोकतील ही वस्तुस्थिती आहे. कोणाला कोणत्या जागा मिळतील हे या क्षणाला ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. महायुती आणि महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्रित निवडणूक लढविल्या गेल्यास कोणत्याही एका पक्षाला तिन्ही जागा मिळणे शक्य गोष्ट आहे.

त्यामुळे नाशिककर महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या पारड्यात या तिन्ही जागा टाकतात की वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार निवडून देतात. हे बघणेच औत्सुक्याचे ठरणार आहे. महायुतीत मनसेने नाशिकच्या काही जागांवर दावा केल्यास मात्र जागा वाटपाची प्रक्रिया खूपच क्लिष्ट होईल हे मात्र निश्चित.

Sharad Pawar, Uddhav Thackeray, Nana Patole, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र अन् हरयाणाच्या विधानसभा निवडणुकांबाबतचा 'तो' मेसेज खरा की खोटा? निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com