नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २८) उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. प्रामुख्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी ‘लाडक्या बहिणींना’ सोबत घेत अर्ज सादर केला. विद्यमान आमदार सुहास कांदे, दिलीप बोरसे, नितीन पवार, डॉ. राहुल आहेर, ॲड. राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, डॉ. हेमलता पाटील यांच्यासह १०५ उमेदवारांनी १३७ अर्ज दाखल केले. ( vidhan sabha election Veteran applications filed with Guardian Minister Bhuse )