Nashik Monsoon : चांदोरीत गोदावरीने सोडले पात्र! प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Monsoon : त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील धरणक्षेत्रात, तसेच नद्यांच्या परिसरात झालेल्या पावसामुळे शनिवारी (ता. ३) गंगापूर आणि दारणा धरण समूहातून गोदावरीला विसर्ग करण्यात आला.
Provincial Officer Hemangi Patil, Tehsildar Vishal Naikwade while inspecting the flood situation here. Water pipes stuck to the bridge here.
Provincial Officer Hemangi Patil, Tehsildar Vishal Naikwade while inspecting the flood situation here. Water pipes stuck to the bridge here.esakal
Updated on

Nashik Monsoon : गेल्या आठवडाभरापासून नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील धरणक्षेत्रात, तसेच नद्यांच्या परिसरात झालेल्या पावसामुळे शनिवारी (ता. ३) गंगापूर आणि दारणा धरण समूहातून गोदावरीला विसर्ग करण्यात आला. त्यामुळे निफाडच्या गोदाकाठ भागात रविवारी (ता. ४) पहाटेपासून पूरस्थिती निर्माण झाली असून, गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नांदूरमध्यमेश्‍वर धरणातून देखील सायंकाळी चारनंतर ४५ हजाराहुन अधिक क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. (Vigilance alert issued by Godavari in Chandori from competent administration)

गोदावरी नदीने पात्र ओलांडल्याने चाटोरी, नागापूर, सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, गोंडेगाव, चापडगाव, मांजरगाव आदी नांदूरमध्यमेश्‍वर धरण परिसरातील गावांतील शेतीक्षेत्रात पाणी शिरले होते. दिवसभर संततधार सुरू असल्याने नांदूरमध्यमेश्‍वर धरणातून पाण्याचा विसर्ग दुपारनंतर वाढविण्यात आला होता.

गोदापात्र ओलांडल्याने नदीकाठावरील बहुतांश वीटभट्ट्या पाण्याखाली गेल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. तर शेतात पाणी शिरल्याने पिकांचेही नुकसान झाले. ग्रामपालिका व प्रशासनाच्या वतीने स्थलांतरीत होण्याबाबतच्या सूचना नदीकाठावरील रहिवाशांना बजावण्यात आल्या असून, संततधार कायम राहिल्यास आणखी पाणी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. (latest marathi news)

Provincial Officer Hemangi Patil, Tehsildar Vishal Naikwade while inspecting the flood situation here. Water pipes stuck to the bridge here.
Nashik Monsoon : सिन्नर तालुक्यातील दुसरे कोनांबे धरण भरले; देवनदी प्रवाहित

दर्श अमावास्येची भरते धडकी

गंगापूर, दारणा धरण समूहातील विसर्गामुळे दारणा-गोदावरीच्या संगमापुढील निफाड तालुक्याच्या गोदाकाठ भागातील दारणा सांगवी, शिंपी टाकळी, सावळी, चाटोरी, सायखेडा, चांदोरी, नागापूर, शिंगवे, करंजगाव, गोंडेगाव, कोठुरे, काथरगाव, चापडगाव, मांजरगाव आदी गावांमध्ये पुराचे पाणी शिरते. २०१६ मध्ये दर्श अमावास्येच्या दिवशीच पुराच्या पाण्याने गोदाकाठ भागात थैमान घातले होते. त्यानंतर २०१७-१८, २०१९ यावर्षीही अमावास्येला पूरस्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा यावर्षीही दर्श अमावास्येच्या पूर्वसंध्येला पूरस्थिती निर्माण झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली.

''गोदाकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यास बचावकार्य करण्यास पोलिस व आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी सज्ज आहेत. गरज पडल्यास पूरभागातील रहिवाशांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येईल.''- हेमांगी पाटील, प्रांताधिकारी, निफाड

''गोदाकाठ भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, प्रशासनाच्या वतीने पुरेशी काळजी घेतली जात आहे. सर्वच विभागासोबत समन्वय साधून आहोत.''- विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड

Provincial Officer Hemangi Patil, Tehsildar Vishal Naikwade while inspecting the flood situation here. Water pipes stuck to the bridge here.
Nashik Monsoon Rain Update : पालखेड पाठोपाठ पुणेगांव धरण 80 टक्के भरले; धरणातून विसर्ग सुरु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.