Dussehra 2024 : घरोघरी अवतरले चैतन्य! विजयादशमीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत गर्दी, सोने, झेंडु फुले महागले

Dussehra 2024 : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसरा सणाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत व घरोघरी चैतन्य अवतरले.
Flowers are in high demand on Dussehra, the eve of which is brought for sale at Sunday Karanja. Artists painting Ravana's masks.
Flowers are in high demand on Dussehra, the eve of which is brought for sale at Sunday Karanja. Artists painting Ravana's masks.esakal
Updated on

नाशिक : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसरा सणाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत व घरोघरी चैतन्य अवतरले. पूजेच्या तयारीसाठी गृहिणींची लगबग, देवीच्या मंदिरांमध्ये गर्दी, सोने, चांदी व वाहन खरेदीसाठी उडालेली झुंबड, झेंडु व आपट्याच्या पानांना आलेला भाव, घटांच्या मिरवणुकीची लगबग, रावन दहन कुठे संचलन, तर कुठे शस्त्रपूजनाची सुरू असलेली तयारी अशा मंगलमय वातावरणात दसरा साजरा करण्यासाठी अवघे शहर सज्ज झाले आहे. (Vijayadashami market is crowded sona leaves marigold flowers are expensive )

नऊ दिवसांपासून अवघे शहर नवरात्रोत्सवात रंगले. शेवटच्या दोन दिवसात मुसळधार पावसाने दांडियाप्रेमींच्या उत्सवाला मर्यादा आल्या तरीही भरपावसात आनंद लुटला. शुक्रवारी (ता. ११) अष्टमी व नवमी एकाच दिवशी आल्याने दुपारी बारापर्यंत होमहवन व नारळ पूर्णाहुती झाली. त्यानंतर दसरा साजरा करण्यासाठी नाशिककर घराबाहेर पडले. दुपारनंतर कोरडे वातावरण निर्माण झाल्यानंतर दसरा खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली. परिणामी शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण झाला.

झेंडू शंभर रुपयांवर

दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे महत्त्व असते. ग्रामीण भागातून शहरात जवळपास दीडशेहून अधिक विक्रेते दाखल झाले. पिवळा व लाल झेंडुने संध्याकाळी भाव खाल्ला. शेकडा शंभर रुपयापर्यंत भाव पोचला. परंतु सायंकाळनंतर आवक वाढल्याने दर घटले. आपट्याच्या पानांची जुडी २५ रुपयांना विकली गेली.

सोने बाजारात तेजी

नाशिकच्या सोने बाजारात २४ कॅरेट सोने ७५,६५० रुपये प्रतितोळा, तर २२ कॅरेट सोने ६९,६०० रुपये प्रतितोळा भाव राहिला. चांदीचा दर ९१ हजार रुपये किलो होता. सोन्याचे दर वाढले असले तरी सणासुदीला खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सराफी पेठेत गर्दी उसळली.

मंदिरांमध्ये गर्दी

नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका माता मंदिरात दुपारनंतर भाविकांची गर्दी उसळली. भगुरची रेणुका माता, रविवार पेठ व गंगापूर रोडवरील तुळजा भवानीमाता मंदिर, भद्रकाली मंदिर, सांडव्यावरची देवी, श्री सप्तशृंगी माता मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली. गर्दीमुळे पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. (latest marathi news)

Flowers are in high demand on Dussehra, the eve of which is brought for sale at Sunday Karanja. Artists painting Ravana's masks.
Dussehra 2024: यंदा 12 की 13 ऑक्टोबर कधी साजरा केला जाणार दसरा? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् वेळ

रावणदहनाची तयारी

दसऱ्याच्या मुहूर्तावर गंगाघाटावर पारंपरिक पद्धतीने रावण दहन केले जाणार आहे. चतुसंप्रदाय आखाड्यातर्फे यंदा ५१ फुटी रावणाची प्रतिकृती उभारली जाणार आहे. गांधीनगर मैदानावर रामलीला समितीच्या वतीने दरवर्षी रावण दहन होते. यंदाचे ६९ वे वर्ष आहे. शनिवारी (ता. १२) संध्याकाळी सात वाजता रावण दहन होईल.

‘आरएसएस’चे संचलन

राष्ट्रीय स्वंयसेवक संघातर्फे शहरात २२ ठिकाणी संचलन होणार आहे. इंदिरानगर, श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा, श्री साक्षी गणेश मंदिर, गंगापूर रोड वरील शिवसत्य मैदान येथे पांरपारीक पद्धतीने संचलन केले जाणार आहे, तर भोसला मिलिटरी स्कूलतर्फे रामदिंडी काढली जाईल.

शस्त्रपूजन

विजयादशमीला शस्रपूजनाला महत्त्व असते. शहर व ग्रामीण पोलिसांकडून शस्रागारामध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर पूजन केले जाणार आहे. भोसला महाविद्यालयातही शस्त्रास्त्रांचे पूजन केले जाणार आहे.

‘रिअल इस्टेट मध्ये तेजी

दसऱ्याच्या मुहूर्तावर घरे, जमीन व वाहने खरेदी केली जातात. नाशिक शहरात तयार घरांना मागणी आहे. तर सध्या फार्महाऊस प्लॉटकडे अधिक कल दिसतो. दसऱ्याच्या दिवशी बाजारात शंभर कोटींची उलाढाल शक्य आहे. चारचाकी वाहन चालविण्याच्या जमान्यात इलेक्ट्रिक वाहनांना भाव आला असून नवीन बुकिंग फुल झाले आहेत. वाढती मागणी लक्षात घेऊन दसऱ्याला बुकिंग व दिवाळीला डिलिव्हरीचे नियोजन शोरूममध्ये होताना दिसले.

महाबोधी वृक्षाचा वर्धापन दिन

त्रिरश्‍मी लेणी येथे मागील वर्षी रोपण करण्यात आलेल्या महाबोधी वृक्षाचा प्रथम वर्धापन दिन १२ ऑक्टोबरला साजरा होत आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजूजी व रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती आहे.

Flowers are in high demand on Dussehra, the eve of which is brought for sale at Sunday Karanja. Artists painting Ravana's masks.
Dussehra 2024 : नाशिक रामतीर्थावर आज 51 फुटी प्रतिकात्मक रावणदहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.