नाशिक : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी जय्यत तयारी केली आहे. मंगळवारी (ता. १६) शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीला भद्रकालीतील वाकडी बारव येऊन प्रारंभ होणार असून यावेळी शहरातील २१ मंडळांनी मिरवणुकीसाठी पोलीस परवानगी घेतली आहे. मिरवणुकीच्या अग्रस्थानी महापालिकाचे मानाचा श्रीं असेल. याशिवाय, नाशिकरोड, सिडको, सातपूर, गंगापूर या उपनगरांमध्येही विसर्जन मिरवणुका निघतील. त्यांना संबंधित पोलीस ठाण्यांकडून परवानगी दिली जाईल. (21 mandal allowed in main immersion ganesh procession)