Voter Registration Malegaon Pattern: मतदार नोंदणीचा ‘मालेगाव पॅटर्न’! मालेगाव मध्यमध्ये साडेतीन महिन्यांत 37 हजार मतदारांची वाढ

Latest Political News : गेल्या साडेतीन महिन्यांत ही वाढ नोंदविली गेल्याने एवढे मतदार वाढले तरी कसे, याविषयी आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
voter registration
voter registrationesakal
Updated on

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघाच्या निकालास कलाटणी देणाऱ्या मालेगाव मध्य मतदारसंघात तब्बल ३७ हजार ६१९ मतदार वाढले आहेत. गेल्या साडेतीन महिन्यांत ही वाढ नोंदविली गेल्याने एवढे मतदार वाढले तरी कसे, याविषयी आश्‍चर्य व्यक्त होत आहे. (Voter Registration Malegaon Pattern)

जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी ही संख्या ४८ लाख ३६ हजार इतकी होती. मात्र, या निवडणुकीत मतदारांनी चांगला उत्साह दाखविला. विशेषत: धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेल्या मालेगाव मध्य मतदारसंघाची भूमिका निर्णायक ठरल्याचे बोलले जाते.

या निवडणुकीचा गुलाल उधळताच इच्छुकांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने मतदार नोंदणी अभियानात सहभागी होत नवमतदारांनी जून ते २० सप्टेंबर २०२४ या कालावधीत नोंदणी केली. यात मालेगाव मध्य या मुस्लिमबहुल मतदारसंघात २० हजार २६५ महिला व १७ हजार ३५२ पुरुषांनी नोंदणी केली आहे.

उर्वरित सर्व मतदारसंघांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक तर आहेच याशिवाय एकमेव मतदारसंघ आहे ज्यात १२.४४ टक्के नोंद झाली. जिल्ह्यातील उर्वरित १४ मतदारसंघांत किरकोळ वाढ झालेली दिसून येते. त्यातही मालेगाव बाह्य या मतदारसंघात १०४ मतदान केंद्रे मुस्लिमबहुल भागात आहेत.

येथे १४ हजार ३४१ मतदारांची वाढ झालेली दिसून येते. म्हणजे या ठिकाणीही मुस्लिमबहुल मतदारांची जास्त नोंद झाली आहे. नाशिक शहरातील नाशिक मध्य मतदारसंघात १४ हजार ३५९ मतदार वाढले. नाशिक पूर्वमध्ये १५ हजार ७०८ आणि नाशिक पश्‍चिममध्ये २० हजार ८५० नवमतदार आहेत. नवमतदारांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.

voter registration
Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

महिला मतदारांचे प्रमाण वाढले

लोकसभा निवडणुकीनंतर मतदान नोंदणीमध्ये ९६ हजार ५३८ महिलांचा समावेश आहे. पुरुषांचे प्रमाण ७० हजार ९४४ इतके आहे. पुरुषांच्या तुलनेत २५ हजार ५९४ ने महिलांची संख्या जास्त आहे. शासनाच्या योजनांमुळे महिला मतदारांची संख्या वाढल्याचे बोलले जाते.

"लोकसभा निवडणुकीनंतर नवमतदारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली. यात महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात दिसून येतो. शासकीय योजनांमुळे महिलांचा उत्साह वाढलेला आहे."

-डॉ. शशिकांत मंगरुळे, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग

मतदारसंघनिहाय नोंदणी (कंसात टक्के)

नांदगाव- ५,४८० (१.६५)

मालेगाव मध्य- ३७,६१९ (१२.४४)

मालेगाव बाह्य- १४,३४१ (३.९७)

बागलाण- ६,४६८ (२.२३)

कळवण- ५,२७० (१.७९)

चांदवड- ६,४४० (२.१५)

येवला- ७,४२८ (२.३६)

सिन्नर- ११,३२६ (३.६९)

निफाड- ४,४८० (१.५४)

दिंडोरी- ५,६४२ (१.७५)

नाशिक पूर्व- १५,७०८ (४.०४)

नाशिक मध्य- १४,३५९ (४.३८)

नाशिक पश्‍चिम- २०,८५० (४.५७)

देवळाली- ८,८०६ (३.१८)

इगतपुरी- ३,२६८ (१.१९)

एकूण : एक लाख ६७ हजार ४८५ (३.४६)

voter registration
U19 IND vs AUS Cricket Match: साहिलच्‍या घणाघाती नाबाद 109 धावा! भारताकडून खेळताना 19 वर्षाआतील गटात ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध कामगिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.