Nashik Lok Sabha Election : कोठे मतदान यंत्रामध्ये बिघाड, तर कोठे मतदारयादीत घोळ

Lok Sabha Election : मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाले, काही मतदान केंद्रांवरील मतदार यादीत घोळ असल्याचे दिसून आले.
Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituencyesakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाले, काही मतदान केंद्रांवरील मतदार यादीत घोळ असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी जिवंत मतदार मृत दाखविले गेले तर, मृत मतदारांचे नाव मतदार यादीत दिसले. त्यामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागला. ( voters suffered due to technical problems in voting machines )

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांतील १ हजार ९२२ मतदान केंद्रावर सोमवारी (ता.२०) सकाळी मतदानास प्रारंभ झाला. मात्र, अनेक मतदान केंद्रावर गैरसोय झाल्याने मतदारांचे हाल झाले. येवला तालुक्यातील चिचोंडी खुर्द येथील व्हीव्हीपॅट यंत्र दुपारी एक वाजता बंद पडल्याने एक तास मतदान खंडित झाले होते. त्यावेळी मतदान केंद्राच्या व्हरांड्यात महिला व पुरुषांची गर्दी केली दरम्यान एक तासानंतर मशिन पुन्हा सुरू झाले.

दरम्यान आमचा एक तास वाढवून द्यावा, अशी मागणी येथील मतदारांनी यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली होती. पेठ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सुलभा नगर येथील शाळेतील मतदान केंद्र क्रमांक १५८ मधील मशिनमध्ये सकाळी साडे आठ वाजता बिघाड झाला. त्यामुळे महिला पुरुषांसह मतदारांच्या या मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. मशिन बंद पडल्याने काही काळ याठिकाणी गोंधळ झाला होता.

तब्बल दीड तासाने नवीन मशिन आल्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. नांदगाव शहरातील बूथ क्रमांक १७१ वरील मतदान मशिन वीस मिनिटे बंद झाले. त्यानंतर, निवडणूक अधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था केल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ववत झाली. नांदगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक केंद्रांवरील मतदार यादीत घोळ असल्याच्या तक्रारी आल्या. गंगाधरी येथील केंद्रावर अगोदर मृत दाखविले नंतर मतदान करून घेतल्याने टीका झाली. (latest marathi news)

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Election : उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात होणार बंद; प्रशासन सज्ज, सोशल मीडियावर प्रचार

जातेगाव येथे काही मतदारांची नावे मतदार यादीत नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. मालेगाव तालुक्यातील मेहुणे येथील गावात मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. हा बहिष्कार अखेरपर्यंत कायम राहिला. निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे येथील बूथ क्रमांक १५९, १६० व १६१ या तीन मतदान केंद्रावरील इव्हीएम मशिनवर अंधार पडत असल्याने मतदारांना चिन्ह व्यवस्थित दिसत नसल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या. मतदारांच्या या वाढत्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ इव्हीएमच्या जागा बदलत मतदान पूर्ववत सुरू केले.

मतदानकार्ड असूनही वंचित

नाशिक शहरातील काही मतदारांकडे मतदानाचे कार्ड असूनही मतदार यादीत नाव सापडत नसल्याने या मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. मतदान कार्ड असलेल्या या मतदारांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मतदारयादीत नाव तपासून घेतल्यानंतर अनेकवेळा मतदान केलेले आहे.

त्यामुळे यंदा आपोआप मतदारयादीतून त्यांचे नाव कसे वगळले गेले याबाबत संबंधित मतदार आश्‍चर्य आणि संताप व्यक्त करत होते. तर बीएलओंकडून त्यांना पुन्हा नवीन नावनोंदणी करण्याचा सल्ला देण्यात आला. यामुळे उत्साहाने मतदानासाठी आलेल्या मतदारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये 61 टक्के, तर दिंडोरीत 63 टक्के मतदारांनी बजावला हक्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.