मनमाड : काही दिवसांपूर्वी सतत झालेला पाऊस आणि पालखेड धरणाच्या अवर्तनाचे मिळालेले पाणी यामुळे धरणात पाणीसाठा वाढल्याने मनमाडचे धरण कधी भरणार, या प्रतीक्षेत मनमाडकर असतानाच वागदर्डी धरण ओव्हरफ्लो झाल्याने ओसंडून वाहू लागल्याने पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या मनमाड शहराला काहीसा दिलासा मिळाला आहे. सतत पाणी टंचाईने बेजार असलेल्या मनमाड शहराला हा मोठा दिलासा मानला जात असला तरी गेल्या २५ दिवसापासून शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने घरोघरी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. (Wagdardi dam overflows)