Saptshrungi Gad : आदिमायेच्या चरणी 31 फुटी त्रिशूळ अर्पण!

Nashik News : सप्तशृंगगडावर आदिमायेच्या चरणी गोताणे (जि. धुळे) येथील पदयात्रेकरू मंडळाने गुरुवारी (ता. २३) सुमारे ३१ फूट उंचीचा त्रिशूळ मिरवणूक काढून अर्पण केला.
Devotees from Gotane hand over the 31-foot iron trident to the Trust and chanted 'Sadhan Maharaj' and the devotees.
Devotees from Gotane hand over the 31-foot iron trident to the Trust and chanted 'Sadhan Maharaj' and the devotees.esakal
Updated on

वणी : आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर आदिमायेच्या चरणी गोताणे (जि. धुळे) येथील पदयात्रेकरू मंडळाने गुरुवारी (ता. २३) सुमारे ३१ फूट उंचीचा त्रिशूळ मिरवणूक काढून अर्पण केला. गोताणे (ता. जि. धुळे) येथील समाधान हाके हे सद्गुरू रामदास बाबा व गुरुवर्य राजूबाबा मुंजवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आठ वर्षांपासून चैत्रोत्सवात गोताणे ते सप्तशृंगगड अशी पदयात्रा काढतात. (Wani Trishul about 31 feet high was offered by Padayatra Mandal to Saptshringigarh)

पदयात्रेत सहभागी भाविकांची संख्या वाढत असून, या वर्षी अडीच हजारांवर पदयात्रेकरू सहभागी झाले होते. दरम्यान, दिंडीचालक समाधान हाके यांनी वर्षापूर्वी श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर मोठ्यात मोठा त्रिशूळ उभारण्याचे ठरविले.

त्यानुसार त्यांनी पदयात्रेकरूंच्या सहकार्याने भव्य त्रिशूळ उभारण्याचे काम हाती घेऊन कुसुंबा येथे त्रिशूळासाठी आवश्यक सामग्रीची व्यवस्था करून गेल्या नवरात्रोत्सवात सुमारे दीड टनाचा ३१ फूट उंच व साडेसहा फूट रुंद त्रिशूळ साकारला. बनवलेला त्रिशूळ गेल्या महिन्यातील चैत्रोत्सवात दिंडी पालखीने गोताणे ते नांदुरीदरम्यान पदयात्रेने आणण्यात आला.

चैत्र पौर्णिमेस हा त्रिशूळ आदिमायेच्या चरणी अर्पण करण्यात येणार होता. मात्र, यात्रोत्सवात गडावर असलेली लाखोंची गर्दी यामुळे प्रशासनाने त्रिशूळ गडावर नेण्यास परवानगी न दिल्याने तो नांदुरी येथेच ठेवण्यात आला होता. (latest marathi news)

Devotees from Gotane hand over the 31-foot iron trident to the Trust and chanted 'Sadhan Maharaj' and the devotees.
Nashik Civil Hospital: 'अहो, बॉसने मला नाही ओळखले...मी कालू आहे' गर्दुल्याने केली सिव्हिलमध्ये मोबाईल शुटिंग!

दरम्यान, गुरुवारी वैशाख पौर्णिमेनिमित्त समाधान हाके व मंडळाने आकर्षक फुल-माळांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून त्रिशूळ गडावर आणण्यात आला. गडावर त्रिशूळाची मिरवणूक काढण्यात येऊन सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टकडे सुपूर्द केला. ट्रस्टच्या वतीने व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी गोताणे पदयात्रेकरू मंडळासह दिंडीचालक समाधान हाके यांचा सत्कार केला. ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी, सप्तशृंगगड ग्रामपंचायतीचे सदस्य राजेश गवळी उपस्थित होते.

"गोताणे येथील समाधान महाराज व दीपक पवार यांच्या गुरुबंधूंनी शिवालय तलावात मध्यभागी लावण्यासाठी भोले बाबाचे ३१ फुटाचे त्रिशूळ देवीला अर्पण केले आहे. त्यांचे ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने आभार. हा भव्य त्रिशूळ शिवालय तलावात बसविल्यास भाविकांची मोठी गर्दी शिवालय तलाव परिसरात होईल. रोजगार पण वाढेल. अर्थकारणाला चालना मिळेल." - राजेश गवळी, ग्रामपंचायत सदस्य, सप्तशृंगगड

Devotees from Gotane hand over the 31-foot iron trident to the Trust and chanted 'Sadhan Maharaj' and the devotees.
Nashik Traffic Rules Break: वाहनांतून धोकादायकरित्या सामानाची वाहतूक! वाहतूक पोलिसांचे दूर्लक्ष; भीषण दूर्घटनेची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.