NMC News : कंत्राटी कामगारांचा भविष्यनिर्वाह निधी गेला कुठे? महापालिकेचे बँक खाते गोठविण्याचा इशारा

NMC : महापालिकेत आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून विविध प्रकारची कामे केली जातात.
nmc
nmc esakal
Updated on

NMC News : महापालिकेत आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून विविध प्रकारची कामे केली जातात. ठेकेदारांकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी भरण्याची जबाबदारीदेखील संबंध ठेकेदारांकडे असते. मात्र, २०१६ या कालावधीतील कंत्राटी कामगारांचा भविष्यनिर्वाह निधी भरला गेला नसल्याने या कार्यालयाकडून महापालिकेवर कायदेशीर कारवाई करण्याचा तसेच बँकेचे खाते गोठविण्याचा इशारा दिला आहे. ( Warning to freeze bank account of Municipal Corporation )

त्याअनुषंगाने समाज कल्याण विभागाकडून विविध विभागांची पत्रव्यवहार करून ठेकेदारांना भविष्यनिर्वाह निधी अदा करण्यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे. महापालिकेचा आकृतिबंध जवळपास ७०९० पदांचा आहे, मात्र अद्याप नव्याने भरती झाली नसल्याने जवळपास ४ हजार ८०० कर्मचारी सद्यःस्थितीत कार्यरत आहे. यातही २००० सफाई कर्मचारी आहे. शहराचा विस्तार वाढत असताना कर्मचारी व कामगारांचीदेखील तितक्याच प्रमाणात गरज आहे मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे काम करतात नाही त्यामुळे महापालिकेने काही विभागांच्या बाबतीत आऊटसोर्सिंगची भूमिका घेतली आहे.

पूर्व, पश्चिम विभागांमध्ये रस्त्यांची झाडलोट, जलशुद्धीकरण केंद्रांची स्वच्छता, मलनिस्सारण केंद्रांची स्वच्छता, वॉलमन, घरोघरचा कचरा संकलित करणे, पथदीप देखभाल व दुरुस्ती, धूर व औषधांची फवारणी, अग्निशमन दलात ४० फायरमन, महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालय व पंपिंग स्टेशनवर सुरक्षारक्षक पुरविणे, निर्बीजीकरण करणे, कचरा डेपोमध्ये साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, वाहनचालक, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, घरपट्टी व पाणीपट्टी देयकांचे वाटप, स्मार्ट स्कूल, नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयामध्ये क्ष- किरण तपासणी करणे, आदी प्रकारच्या सुविधांचे खाजगीकरण करण्यात आले आहे. (latest marathi news )

nmc
Nashik NMC News : नाशिककरांचा मतदानाचा टकका वाढवण्यासाठी रंग रेषांचा आविष्कार

आऊटसोर्सिंग माध्यमातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुविधा पुरविण्याबरोबरच त्यांचा भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भरणे ठेकेदारांना बंधनकारक आहे. त्याच अनुषंगाने महापालिकेतूनदेखील करार करण्यात आले आहे. मात्र २०१६ मध्ये भविष्यनिर्वाह निधी भरला गेला नसल्याची बाब समोर आली. त्याचबरोबर महापालिकेतून भविष्यनिर्वाह निधी भरण्यासंदर्भात कुठलेही पुरावे सादर झालेले नाही.

जवळपास १७ लाख ७६ हजार २९५ इतकी रक्कम भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाकडे भरणे अपेक्षित आहे. यासंदर्भात या कार्यालयाकडून महापालिकेच्या समाजकल्याण विभागाकडेदेखील पत्र व्यवहार करण्यात आला, मात्र अद्याप ती रक्कम भरली गेली नाही. त्यामुळे समाज कल्याण विभागाचे उपायुक्त मयूर पाटील यांनी विविध विभागांना भविष्यनिर्वाह निधी भरण्यासंदर्भात ठेकेदारांना सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची पूर्तता केली आहे किंवा नाही केली नसल्यास मक्तेदारांकडून पूर्तता करून योग्य ती कारवाई करावी अशा सूचना पत्राच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर भविष्यनिर्वाह निधीची रक्कम वजा केल्याशिवाय ठेकेदारांचे देयक अदा करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

महापालिकेवर होणार कारवाई

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी भरण्याची जबाबदारी त्या, त्या ठेकेदारांवर असली तरी कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधीच्या रक्कम भरली आहे किंवा नाही याची खात्री जमा महापालिकेच्या संबंधित विभागांना करणेदेखील गरजेचे आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली गेली नाही. त्यामुळे भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने महापालिकेवर कायदेशीर कारवाई किंवा बँक खाते गोठविण्याची प्रक्रिया करण्याचा इशारा दिला आहे.

nmc
Nashik NMC News : स्ट्राँगरूमच्या स्वच्छतेसाठी 44 कर्मचाऱ्यांचे विशेष पथक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.