Nashik News : आजची स्त्री गृहिणी नसून, ती कार्यक्षम पॉवरफुल वूमन झाली आहे. स्वतंत्र व निर्भीड होत ‘हम भी कुछ कम नहीं’ अशीच नवी ओळख वेगवेगळ्या क्षेत्रात होत आहे. असे एकही क्षेत्र नाही की तिथे महिला कार्यरत नाही. महिला विमानसेवेसह अगदी पायलट, पोलिस, वाहक, डॉक्टर, इंजिनिअरपासून तर अगदी अर्थक्षेत्र ते भारतातील सर्वोच्च पद राष्ट्रपती पदापर्यंत महिलांनी मजल मारली आहे. (Nashik warrior who climbs an electric pole and performs her duty marathi news )
महावितरणसारख्या अत्यावश्यक सेवेत ‘उंच माझा झोका गं’ म्हणत सरसर विद्युत खांबावर चढणाऱ्या निता विसपुते या रणरागिणीची कामगिरी तरुणांसाठी आदर्शदायीच आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना वेगवान जगात महिलांनी अलिकडे सर्वच क्षेत्रात आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. अगदीच पुरुषांच्या बरोबरीने लहान-मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्याचे धाडस कमालीचे आहे.
एकीकडे गावगाड्याच्या रहाटगाडग्यात आजही महिला भगिनींच्या आवाजाची घुसमट होत असताना जगणं समृद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील काही महिलांची धडपड व प्रवास नव्या पिढीच्या मुलींना मार्गदर्शक आहे. जोखमीचे काम पुरूष वर्गाकडेच होते. परंपरागत अशा अनेक क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीनेच काय तर पुढे जाऊन काम करत आहेत. महावितरणच्या सेवेत अलिकडे महिला कर्मचारी दाखल झाल्या आहेत. (latest marathi news)
त्यात निता विसपुते या विषेशतः उंच विद्युत खांबावर चढून दुरुस्तीचे धाडसी काम करत आहे. त्यांच्या अनोख्या धाडसाचे कौतुक होत आहे. महावितरण कंपनीत अनेक महिला व पुरुष कर्मचारी आहेत. विषेशतः विद्युत सहाय्यक पदावर असलेल्या महिला कर्मचारी वीज वसुली, सबस्टेशनच्या देखभालीसह ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण स्वतः करतात. निता यांनी शासकीय तंत्रनिकेतननंतर तत्सम शिक्षण पूर्ण केले. त्यांची स्वतःची इच्छा होती की, आपण इतरांपेक्षा वेगळे काही करावे. त्यात वडिलांच्या पाठबळावर ही संधी कुटुंबासाठी महत्वपूर्ण ठरली.
''तंत्रज्ञानाच्या युगात आज कुणी मागे राहु नये. महावितरणच्या कामात हौस व जिद्द होती. इतरांपेक्षा काही वेगळे करण्याची इच्छा मनात होती. अनेकवेळा ११ हजार के.व्ही.च्या उच्चदाब वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम स्वतः केले. बहुदा ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. संस्कृती जपताना महिला सक्षमीकरण महत्वाचे आहे. मुलींनी आव्हानात्मक भूमिका स्वीकारली पाहिजे.''- निता विसपुते, विद्युत सहाय्यक, वडगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.