Nashik EVM Awareness LED Van : मतदार जनजागृती नव्हे, पैशांची उधळपट्टी! ‘ईव्हीएम’ जागृतीवर निवडणूक विभागाचा 90 लाखांचा खर्च

Latest Nashik News : धक्कादायक बाब म्हणजे जनजागृती करणारी व्हॅन एकाच ठिकाणी मोकळ्या जागेत उभी राहते. त्याकडे कुणाचेही लक्ष जाणार नाही, याची जणू काळजीच घेतली जाते.
By 11.06 am, eight cars were standing in the collector's office parking lot.
By 11.06 am, eight cars were standing in the collector's office parking lot.esakal
Updated on

Nashik EVM LED Van : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राविषयी (ईव्हीएम) जनतेच्या मनातील शंका दूर करण्यासाठी निवडणूक विभागाने लावलेल्या ‘एलईडी व्हॅन’ म्हणजे जनतेच्याच डोळ्यांत धूळफेक आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेल्या गाड्या नेमक्या कशा पद्धतीने जनजागृती करतात, या विषयी ‘सकाळ’ने या गाड्यांचा दिवसभर पाठलाग करून सत्यता तपासली.

त्यातील धक्कादायक बाब म्हणजे जनजागृती करणारी व्हॅन एकाच ठिकाणी मोकळ्या जागेत उभी राहते. त्याकडे कुणाचेही लक्ष जाणार नाही, याची जणू काळजीच घेतली जाते. कालांतराने ही गाडी येथून निघते आणि पुन्हा पार्किंगमध्ये लावली जाते. त्यामुळे निवडणूक विभागाची ही मोहीम म्हणजे ‘मतदार जनजागृती’ नव्हे, तर निव्वळ ‘पैशांची उधळपट्टी’ करण्यासाठीच असल्याची शंका यानिमित्त उपस्थित होत आहे. (Waste of money no voter awareness EVM LED Van)

 सकाळी ११ वाजून सात मिनिटांनी पहिली गाडी कार्यालयाबाहेर पडली आणि सकाळी ११.२६ वाजता सातपूर येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात ही गाडी जावून पोहोचली.
सकाळी ११ वाजून सात मिनिटांनी पहिली गाडी कार्यालयाबाहेर पडली आणि सकाळी ११.२६ वाजता सातपूर येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात ही गाडी जावून पोहोचली.esakal

निवडणुकीत अपेक्षित निकाल लागला नाही, की मतदार ‘ईव्हीएम’विषयी शंका उपस्थित करतात. अगदी हे मशिन ‘मॅनेज’ असल्याचाही प्रचार काही वेळा केला जातो. त्यामुळे निवडणुकीत मतदानावर परिणाम होत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे.

यावर उपाय म्हणून निवडणुकीपूर्वीच एलईडी व्हॅनद्वारे ‘ईव्हीएम’विषयी जनजागृती केली जाते. लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात महिनाभर ‘ईव्हीएम’ जनजागृती मोहीम राबविण्यात आली. विधानसभा मतदारसंघनिहाय दोन गाड्यांची नियुक्ती केली. त्यावर एलईडी स्क्रीन बसविण्यात आला. या स्क्रीनवर ईव्हीएम कसे सुरक्षित आहे, याविषयी जनतेला माहिती दिली जाते.

महिनाभर केलेल्या जनजागृतीचे संबंधित कंत्राटदाराने अडीच कोटी रुपयांचे बिल सादर केले होते. त्यावर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आक्षेप नोंदवत सुटीच्या काळातील पैसे कपात करून एक कोटी ४७ लाख रुपये कंत्राटदारास अदा केले. त्याच धर्तीवर जिल्हा निवडणूक विभागाने १० सप्टेंबर २०२४ पासून २८ दिवसांसाठी ईव्हीएम जनजागृती मोहिमेला कार्यारंभ आदेश दिला आहे.

त्याचा खर्च ९२ लाख ४० हजार रुपये आहे. त्यात पूर्वीपेक्षा अधिक कडक नियम व अटी लागू केल्या. प्रत्यक्षात या एलईडी व्हॅनकडे मतदार पाहतही नसल्याचे दिसून आले. मग शासनाच्या निधीचा अपव्यय कशासाठी, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

एकाच ठिकाणी तासन्‌तास ‘आराम’

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पार्किंगमध्येच गाडीचालक झोपा काढत असल्याचे छायाचित्र उपजिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले होते. त्यानंतरही या मोहिमची ‘जागृती’ झाली नाही. एकाच ठिकाणी गाडी उभी करून ठेवायची आणि सायंकाळी वेळ झाली की परत पार्किंगमध्ये आणून लावायची, अशा स्वरूपाची ही मोहीम पार पाडली जात आहे. (latest marathi news)

By 11.06 am, eight cars were standing in the collector's office parking lot.
CM Eknath Shinde : "सीएम साहेबांचा दरवाजा बंद ? " मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने चक्क आमदाराला नाकारला प्रवेश !

"इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आहे. जनजागृती व्हॅनबाबत काही दिवसांपूर्वी छायाचित्रे प्राप्त झाली होती. याची विचारणा संबंधित कंत्राटदाराकडे केली आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल."-डॉ. शशिकांत मंगरुळे, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग, नाशिक

घटनाक्रम :

स. ९.३३ : जिल्हाधिकारी कार्यालयात आठ ‘ईव्हीएम’ जनजागृती व्हॅन उभ्या

स. १०.४७ : यातील पाच गाड्या पार्किंगमधून शंभर फुटांवरील दुसऱ्या पार्किंगमध्ये उभ्या

स. ११.०६ : पहिली गाडी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पडली, त्यात एक चालक, एक कर्मचारी व पोलिस सुरक्षारक्षक

स. ११.२६ : ही गाडी थेट महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयासमोर जाऊन उभी राहिली, तिघेही गाडीतून उतरले. एकाने पोहोचल्याचे छायाचित्र काढले

स. ११.३३ : मतदान जागृती करण्यासाठी एलईडी स्क्रीन सुरू केला, त्याचा आवाजही एकदम कमी ठेवला

दु. १२.४४ : गाडीवरील एलईडी स्क्रीन बंद करण्यात आला. दोन तासांमध्ये एकाच व्यक्तीने या स्क्रीनकडे पाहून विचारणा केली

By 11.06 am, eight cars were standing in the collector's office parking lot.
Dengue Disease : डेंगीचा डंख लाखाला..! माहिती, उपाय, खबरदारी जाणून घ्या सर्वकाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.