नाशिक : विधानसभा निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले ते मतमोजणीकडे. मतपेट्या (इव्हीएम) आयुक्तालय हद्दीतील चार मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सशस्त्र सुरक्षारक्षकांच्या तैनातीखाली सिलबंद स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. स्ट्राँग रुमभोवती सशस्त्र सुरक्षारक्षकांचे तिहेरीकडे उभारण्यात आलेले आहे. याशिवाय सीसीटीव्हींचा वॉच आहे. दरम्यान, मतमोजणीच्या दृष्टिकोनातून जय्यत तयारी सुरू आहे.