Nashik Water Crisis : नाशिक जिल्ह्यातील 5 लाख लोकांच्या घशास कोरड! 768 गाव-वाड्यांना 256 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

Water Crisis : जिल्ह्यात उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअस पार जात असताना दुष्काळामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे
Water Crisis
Water Crisisesakal
Updated on

Nashik Water Crisis : जिल्ह्यात उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअस पार जात असताना दुष्काळामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील २३३ गावे व ५३५ वाड्यांवरील चार लाख ८० हजार १३६ नागरिक व दोन लाख जनावरांची २५६ टँकरच्या ५६३ फेऱ्यांद्वारे तहान भागवली जात आहे. यातच जिल्ह्यातील धरणांची पातळी खालावत चालली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत असून, टंचाईचे संकट आणखी गडद होत आहे. (Nashik Water Crisis 5 lakh people in district)

जिल्ह्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे धरणे, छोट्या-मोठ्या तलावांमध्ये पुरेसा साठा झालेला नाही. तसेच, दिवसेंदिवस कडक उन्हाळा जाणवत असल्याने भूगर्भातील पाणीपातळीही खालावत चालली आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला.

जिल्ह्यातील काही गावांना गत वर्षभरापासून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढू लागली. २९ मार्चअखेर आठवड्यात २०६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. ६ एप्रिलला यात वाढ होऊन टॅंकरची संख्या २२६ वर पोहोचली.

जिल्ह्यात सद्यस्थितीत २३३ गावे आणि ५३५ वाड्या अशा ७६८ ठिकाणी २५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक ६४ टँकर नांदगाव तालुक्यात, तर ४५ टँकर येवला तालुक्यात तहान भागविण्याचे काम करीत आहेत. एप्रिलअखेर व मेमध्ये आणखी भयावह परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठ्यासाठी ११५ विहिरी अधिग्रहीत

दुष्काळग्रस्त असलेल्या १२ गावांना तसेच १०३ ठिकाणी टॅंकरसाठी ११५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात बागलाण (३७), चांदवड (५), देवळा (३०), मालेगाव (३१), नांदगाव (४), सुरगाणा (२), येवला तालुक्यासाठी (६) विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.  (latest marathi news)

Water Crisis
Nashik NMC News : महापालिकेच्या रुग्णालयात उपचारांकडे कल! वर्षभरात 10 लाख उपचार, 4 हजार शस्रक्रिया

टँकरद्वारे सुरू असलेली गाव-वाड्या व लोकसंख्या

तालुका गाव-वाड्या लोकसंख्या सुरू असलेले टॅंकर

बागलाण ३५ ५९ हजार ११२ ३२

चांदवड ९३ ६६ हजार ६०२ २९

देवळा ६१ २५ हजार ७८० ३०

इगतपुरी १ ९१० १

मालेगाव १०७ ९४ हजार ५३९ ३६

नांदगाव ३१३ १ लाख २६ हजार ६८८ ६४

सिन्नर ७६ २७ हजार ७६३ १७

सुरगाणा ५ १ हजार ३३५ २

येवला ७७ ७७ हजार ४०७ ४५

चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

खरीप व रब्बी दोन्हीही हंगाम वाया गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जनावरांना चारा उपलब्ध नाही. ज्या भागात पाणी उपलब्ध होते, तेथे रब्बीची काही पिके झाली आहेत. त्यामुळे थोडा कडबा उपलब्ध झाला. इतरत्र रब्बी हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे कडब्याचे दर कडाडले. तीन ते साडेतीन हजार रुपये शेकड्याने कडबा विकला जात आहे.

तरीही शेतकऱ्यांना पुरेसा कडबा उपलब्ध होत नाही. ओला चारा तालुक्यात थोडाफार आहे. तालुक्यातील जनावरांची संख्या लक्षात घेता जनावरांना चारा व पाणी देणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडत नाही. प्रशासनाने दुष्काळाची दाहकता ओळखून गरज असेल तेथे जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होऊ लागली आहे.

Water Crisis
Dhule District Collector : जिल्ह्यात निरनिराळ्या 472 तक्रारींचे निराकरण : अभिनव गोयल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()