वणी : सप्तशृंगी गड व मार्केंडेय पर्वत परिसरातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटल्याने वन्य प्राण्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कृत्रिम पाणवठेही कोरडे पडल्याने वन्य प्राण्यांची पाण्यासाठी पळापळ सुरू झाली असून, वन्यप्राणी नागरी वस्तींकडे अन्न-पाण्याच्या शोधार्थ सरसावली आहेत. (Nashik Animals birds dying water crisis marathi news)
सप्तशृंगी गड व मार्केंडेय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अहिवंतवाडी, पायरपाडा, चंडीकापूर, भातोडा गावालगत जंगल आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने पक्षी व प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. मोर व माकडे जंगलालगत असलेल्या शेतातील पाण्याच्या ठिकाणी येतात व पिकांची नासाडी करीत आहेत.
विहिरीजवळ साचलेल्या डबक्यात बिबट्या पाणी पिताना लोकांना दिसला. बिबट्याचा वावर असल्याने भिती निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांनी जंगलाच्या बाजूला भांड्यात पाणी ठेवून पशुपक्ष्यांच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.
याबाबत वन विभागानेही दखल घेणे आवश्यक आहे. या भागात सर्व्हे करून पाण्याची उपाययोजना केली पाहिजे. मात्र, तसे होत नाही. या भागात मोराची शिकार झाली होती. पाण्यासाठी वन्य जीव जंगलाबाहेर आल्यास शिकारीचा धोका वाढू शकतो.
"आमच्या शेताला लागून जंगल आहे. या ठिकाणी मोरांचे प्रमाण जास्त आहे. जंगलात पाणी नसल्याने विहिरीजवळ शेतात पाणी प्यायला येतात. त्या ठिकाणी शेतातील पिकांची नासाडी करतात. वन विभागाने जंगलात पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. बिबट्यासारखे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात नागरी वस्तीत येऊ लागले आहेत. त्यामुळे भिती वाढली आहे."
-विठ्ठल भरसट,पायरपाडा
"उन्हाची तीव्रता वाढत असून, जंगलातील पाण्याचे ओढे, नाले कोरडे झाले आहेत. प्राण्यांसाठी पाण्याच्या व्यवस्थेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना करायच्या आहेत. छोटे वनतळे केले जाईल. जंगलांतील कोणत्या भागात व्यवस्था होऊ शकते, याचा आढावा घेण्यात येईल. वन कर्मचाऱ्यांना सूचना देऊन तत्काळ त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे."-राहुल वाघ, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विकास महामंडळ, दिंडोरी विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.