नामपूर : तापमानाचा पारा वाढल्याने भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. शहरातील नागरिकांना सहा-सात दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे शहराचा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत हरणबारी धरणातून थेट पाणी पुरवठा योजना तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Nashik Water Crisis Citizens are fighting for water in Nampur news)
यंदा पावसाने मोसम खोऱ्यात पाठ फिरवल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जानेवारी महिन्यापासूनच विहिरींना तळ गाठला आहे, त्यामुळे मे महिन्यात काय परिस्थिती राहील, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. गेल्या काही वर्षांपासून मोसम नदीपात्रातून होणारा बेसुमार वाळू उपसा, भूजल पातळीत झालेली कमालीची घट यामुळे उन्हाळ्यात दरवर्षी नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.
मोसम नदीकाठावरील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आटल्याने शहराला तब्बल सहा ते सात दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नामपूरकारांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाण्यासाठी दाही दिशा वणवण भटकण्याची वेळ महिलांवर येऊन ठेपली होती. (latest marathi news)
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत ३४ कोटी रूपयांची नामपूर व चार गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू असले तरी नागरिकांना पाणी कधी मिळणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर होण्याआधी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत नामपूरला सदर योजनेचे जलपूजन करण्यात आले. पाइपलाईन, पाण्याची टाकी आदी कामे पूर्ण झाले असले तरी परंतु हरणबारी येथील फिल्टर प्लांटचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत असल्याने टंचाईची धग वाढली आहे.
"जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुमारे चौतीस कोटी रुपयांच्या विनियोगातून नामपूर व चार गाव पाणीपुरवठा योजनेच्या कामात संबंधित ठेकेदाराकडून दिरंगाई झाल्याने १ डिसेंबर २०२३ पासून प्रतिदिन ७ हजार ५८३ रुपये प्रतिदिन दंड आकारला आहे. तसेच सदर योजनेला २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च मंजूर केला जाणार नाही."-एस. बी. भुजबळ, मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.