Nashik Water Crisis : धरण उशाला कोरड घशाला! कादवा नदीपात्र कोरडे पडल्याने जलचर प्राण्यांचा मूत्यू

Water Scarcity : दिंडोरी तालुक्यातील कादवा नदीचे पात्र मार्च सुरू होताच कोरडे झाल्यामुळे यंदा दुष्काळाची तीव्रता किती मोठी आहे, हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची आवश्यकता नाही.
The dried-up Kadwa riverbed.
The dried-up Kadwa riverbed.esakal
Updated on

वणी : दिंडोरी तालुक्यातील कादवा नदीचे पात्र मार्च सुरू होताच कोरडे झाल्यामुळे यंदा दुष्काळाची तीव्रता किती मोठी आहे, हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. करंजवण धरणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कादवा नदीत पाणी नसल्यामुळे जलचर प्राण्यासह पशुपक्षांचे जीवन धोक्यात आले आहे. ‘धरण उशाला, कोरड घशाला’, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरड्या कादवा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी होत आहे. (Nashik Water Crisis Kadwa riverbed marathi news)

दिंडोरी तालुक्यातील करंजवण धरण सर्वांत मोठे आहे. येवला, नांदगाव ( मनमाड शहर) निफाड येथील जनतेला कडक उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी कादवा नदीतून धरणाचे पाणी सोडले जाते. कादवा नदीवर फक्त म्हेळुस्के गावाची पाणी वापर संस्था आहे.

करंजवण, लखमापूर, ओझे या गावांतील शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था स्थापन न केल्यामुळे स्थानिकांना करंजवण धरणातील पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामपंचायतही कधी उन्हाळ्यासाठी लागणारे पाणी आरक्षित करीत नाही. त्यामुळे कादवा खोऱ्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

कादवा नदी पात्राशेजारी या गावांच्या पाणी योजना आहेत. कादवा नदी कोरडी पडले, की पाणी योजना शेवटची घटका मोजतात. यंदा फेब्रुवारीच्या शेवटापासून कादवा नदी परिसरात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे कोरड्या पडलेल्या कादवा नदीपात्रात जलचर प्राणी, पशुपक्षी व जनावरांसाठी पाणी सोडले पाहिजे, अशी मागणी होत आहे.

कादवा नदीवरील बंधारे सर्व फुटल्यामुळे नदीपात्रात पाणी साठत नाही. बंधाऱ्यांची दुरुस्ती झाली, तरी परिसरातील पाणीप्रश्न थोड्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल. बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे. दिंडोरी तालुक्यात लहान-मोठी सहा धरणे आहेत. (Latest Marathi News)

The dried-up Kadwa riverbed.
Water Crisis : रत्नागिरीत 'इतके' दिवस पाणी कपात; शिल्लक साठा पुरवण्यासाठी पालिकेचा मोठा निर्णय

झिरवाळांनी लक्ष घालणे गरचेचे

कादवा नदीवरील नादुरुस्त छोटे तीन ते चार बंधाऱ्यांची दुरुस्ती केल्यास निदान १५ ते २० दिवसांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. सध्या कादवा नदीमध्ये दशक्रिया विधीसाठी पाणी नसल्यामुळे बंधाऱ्यांंची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.

"कादवा नदीवरील ओझे, करंजवण, लखमापूर, कादवा माळुंगीचा या गावातील शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था स्थापन करण्याची आवश्यकता आहे. भविष्यातील पाण्याची परिस्थिती लक्षात घेता तुमचे पाणी आरक्षित असेल, तर तुम्हाला पाणी मिळू शकते नाही, तर तुमच्या डोळ्यासमोर येवला, नांदगाव (मनमाड) व निफाडला पाणी सोडल्यानंतर तुमच्या कादवा काठावरील वीजपुरवठा खंडित केला जाईल, यासाठी पाणी वापर संस्था स्थापन केल्या पाहिजेत. म्हेळुस्के गावासाठी पाणी वापर संस्था स्थापन केली, त्याचे सर्व श्रेय श्री. झिरवाळ यांना जाते. इतर गावातील शेतकऱ्यांनी श्री. झिरवाळ यांची मदत घ्यावी."-सचिन बर्डे, शेतकरी, म्हेळुस्के

The dried-up Kadwa riverbed.
Nashik Water Crisis: अन्न-पाण्यासाठी झुंजणाऱ्या काळविटांना ठिबकच्या नळ्यांचा फास! चांदवडच्या कातरवाडीतील घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()