Nashik Water Crisis : खामखेडा परिसराला पाणीटंचाईची झळ! 3 दिवसाआड पाणीपुरवठा

Nashik News : गिरणा नदी पात्र कोरडेठाक झाल्याने देवळा तालुक्यातील खामखेड्यासह अनेक गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे
A dry Girna riverbed near the water supply well at Khamkheda.
A dry Girna riverbed near the water supply well at Khamkheda.esakal
Updated on

खामखेडा : गिरणा नदी पात्र कोरडेठाक झाल्याने देवळा तालुक्यातील खामखेड्यासह अनेक गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी कमी झाल्याने आता खामखेडा गावाला पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तीन दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत असल्याने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. (Nashik Water Crisis shortage in Khamkheda marahti news)

गिरणा नदी कोरडीठाक झल्याने या नदीवरील पाणीयोजनेच्या सर्वच विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत. खामखेड्याच्या पाणी योजनेची विहीर नदी काठालगत आहे. गेल्या पंधरा वर्षापासून साधारण जानेवरीपर्यत नदीला पावसाचे पाणीं असते, नंतर टप्प्याटप्प्याने आवर्तन सुरु झाल्याने पाणी असते.

मात्र यावर्षी डिसेंबर मध्येच नदीपात्र कोरडे झाल्याने आवर्तन बंद झाले. त्यानंतर लगेचच नदीपात्र कोरडे झाल्याने पाणी पुरवठा करणारी विहीर देखील कोरडीठाक झाली आहे.सध्या विहिरीला पाणीच नसल्याने कुपनलिकेच्या मदतीने पाणी पुरवठा केला जात आहे.

A dry Girna riverbed near the water supply well at Khamkheda.
Water Crisis IPL : दुष्काळात IPL सुरू होतं अन् रूग्णालयातील शस्त्रक्रिया रद्द होत होत्या... अखेर हाय कोर्टानं दिला होता दणका

खामखेड़ा -भऊर या गावाच्या दरम्यान असलेल्या पुलाच्या पूर्व बाजूस गिरणा नदीपात्रात कोल्हापूर टाइप बंधारा तयार केल्यास हा बंधारा पाण्याने भरून भुगर्भातील पाणीसाठ्यामघ्ये वाढ होऊन पाणीटंचाई दूर होईल.

"गिरणा नदीचे पात्र कोरडे पडल्याने नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या अनेक गावातील पाणी योजना बंद झाल्या आहेत. त्यामुळे नदी काठावरील ग्रामस्थांना देखील तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. खामखेडा गावात देखील तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तत्काळ गिरणा नदीला पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे."

- वैभव पवार, सरपंच खामखेडा

A dry Girna riverbed near the water supply well at Khamkheda.
Instant Loan Scheme : झटपट कर्ज ‘अमाप’, पालकांच्या डोक्याला ‘ताप’! तरुणाई कर्जाच्या विळख्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.