येवला : शहराला साठवण पाणीपुरवठा करणारा सुमारे ९० एकराचा तलाव कोरडाठाक पडल्याने तीन दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव सुरू असून, पालिकेच्या वॉटर एटीएमवर पाणी भरण्यासाठी रांगा लागल्या आहेत. (Nashik Water Crisis supply stopped due to drying up of lake at yeola news)
तलाव भरण्यासाठी पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन सोमवारी (ता.२५) सुटले. मात्र, बुधवारी (ता. २७) सायंकाळपर्यंत विंचूरच्या आसपास पाणी आले होते. त्यातच मनमाड रेल्वेचा पाटोदा येथील तलावात अगोदर पाणी दिले जाणार आहे. येवल्याच्या तलवात गुरुवारी (ता. २८) सायंकाळी उशिरा पाणी येण्याची शक्यता आहे. त्यानंतर तलावाची पातळी वाढण्यासाठी दोन दिवस लागणार आहेत. सध्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्यामुळे पाणी आल्यावर शनिवारी रात्री किंवा रविवारी शहरात पाणीपुरवठा होणार आहे.
तीन दिवसापासून पुरवठा ठप्प
साठवण तलाव आटल्याने शेजारच्या विहिरीसह कूपनलिकेतून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी घेतले जात आहे. सहा पंप असताना, सध्या केवळ एकच पंप अर्धवट क्षमतेने सुरू आहे. त्यामुळे थोडे आलेले पाणी दहा-पंधरा मिनिटे काही भागात सोडले जात होते. रमजानच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम भागाला पाणी दिले. सोमवार (ता. २५) नंतर शहरात पाणीपुरवठा झालेला नाही. काही भागात दहा ते बारा दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. (latest marathi news)
वॉटर एटीएमचा आधार
पालिकेच्या माध्यमातून शहरात शनिपटांगण, पारेगाव रोड, पालिका इमारतीसह विविध ठिकाणी वॉटर एटीएम बसविले आहेत. या ठिकाणी रोजच पाणी आणून टाकले जाते. सध्या वॉटर एटीएमच शहराची ताण भागवित आहेत. सर्वच वॉटर एटीएमवर रांगा लागत आहेत.
जवळपास सर्वच नागरिकांना दुचाकीवर जार ठेवून एटीएमसह आजूबाजूच्या वस्त्यांवरही शेतकऱ्यांकडून पाणी उपलब्ध करावे लागत आहे. घरगुती वापरण्यासाठी शहरासह कॉलनी भागात ठिकठिकाणी कूपनलिका असल्याने त्या पाण्याचा मोठा आधार मिळत आहे. पाणी असलेले नागरिक शेजाऱ्यांना पाणी देऊन दातृत्व दाखवीत आहेत.
पाणीदार योजनेचा दिलासा
३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून सुमारे ५५ गावे व संस्थांची तहान भागवली जात आहे. गेल्या महिन्यापासून योजना व्यवस्थापनाने ग्रामपंचायतींना पाच ते सहा दिवसानंतर पाणी देणे सुरू केल्याने अजूनही तलावात थोडेफार प्रमाणात पाणी असून, ५५ वर गावांना टंचाईतही पिण्यायोग्य पाणी मिळत आहे. पालखेडच्या आवर्तनातून योजनेचा तलाव भरून घेतला जाणार असल्याची माहिती व्यवस्थापक उत्तम घुले यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.