Nashik Water Crisis : नांदगावी जनावरांसाठीही टँकरद्वारे पाणीपुरवठा! वाढत्या उन्हामुळे टंचाईग्रस्त गावांचा आकडा वाढतोय

Water Crisis : नांदगाव जिल्ह्यातील सर्वात कमी पर्ज्यन्यमानाची नोंद झालेल्या तालुक्यातील दुष्काळाची दाहकता आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे
water tanker file photo
water tanker file photoesakal
Updated on

नांदगाव : जिल्ह्यातील सर्वात कमी पर्ज्यन्यमानाची नोंद झालेल्या तालुक्यातील दुष्काळाची दाहकता आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. एकीकडे टँकरची संख्या वाढू लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर दुसरीकडे सव्वा लाखाहून अधिक पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची मागणी पुढे आल्याने टँकरच्या संख्येत वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Nashik Water Crisis Water supply by tanker for Nandgaon marathi news)

सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पारा ३८ अंशाच्या आसपास राहू लागला आहे. पाच वर्षांपूर्वी दुष्काळाची दाहकता अनुभवलेल्या तालुक्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करण्याची नामुष्की आली आहे. त्याचीच पुनरावृत्ती यंदाच्या दुष्काळसदृश्य तालुक्यात पुन्हा एकदा उभी राहू पाहत आहे.

नाग्यासाक्याऐवजी सध्या माणिकपुंज धरणातून टँकरद्वारे तालुक्यातील ४७ टंचाईग्रस्त गावांना व २२२ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा होत आहे. त्यासाठी दररोज दरडोई १८ लाख ३६ हजार २४० लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

यात पुन्हा नव्याने जवळकी, हिरेनगर, मुळडोंगरी, बाणगाव बुद्रुक, पिंप्री-हवेली, गोंडेगाव, गिरणानगर, सावरगाव, नागापूर, जळगाव बुद्रुक, बाभूळवाडी, रणखेडा, परधाडी, तांदुळवाडी व जामदरी या १३ गावे व ७५ वस्त्यांसाठी टँकरची मागणी नोंदविण्यात आल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढून ६० गावे व २९५ वाड्या-वस्त्यांसाठी एकूण टँकर व फेऱ्या वाढणार आहेत.

आता माणसांसोबत जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करण्याची आवश्यकता भासू लागल्याने त्यासाठीच्या टँकर संख्येत भर पडणार आहे. मात्र, त्यासाठी गावनिहाय ग्रामपंचायतींचे प्रस्ताव अद्यापही आले नसल्याचा खुलासा यंत्रणेकडून केला जात आहे. त्यामुळे सध्या तरी जनावरांसाठी टँकर सुरु करण्यात आलेले नाहीत. परंतु, पाणीटंचाईने तोंड वर काढल्याने तालुक्यातील शेळ्या-मेंढ्यांसह लहान-मोठ्या जनावरांचे हाल सुरू झाले आहेत. (latest marathi news)

water tanker file photo
Nashik Water Crisis : प्राणी, पक्षींची पाण्यासाठी वणवण! सप्तशृंगी गड, मार्केंडेय पर्वत परिसरातील पाण्याचे स्त्रोत आटले

विकतच्या चाऱ्यावरच भिस्त

पशुधन जगविण्यासाठी शेतकरी कष्ट घेत असला तरी मेंढपाळांसह पशुपालकांना चारा आणि पाण्याची सोय करताना नाकीनव आले आहे. तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत कोरडेठाक पडले असले तरी विकतचा चारा घेऊन जनावरांच्या वैरणीचा प्रश्‍न सोडविला जात आहे. येत्या काही दिवसांत जनावरे वाचविण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवावे लागणार आहे. सर्वत्र विकतचा चारा घेवूनच जनावरे वाचविण्याची वेळ आली आहे.

जनावरांची अशी आहे स्थिती

- लहान जनावरांना प्रतिदिन साडेसात किलो चारा

- मोठ्या जनावरांना प्रतिदिन पंधरा ते वीस किलो चारा

- नांदगावला लहान-मोठी सव्वालाख जनावरे

- दररोज १२ ते १३ लाख किलो चारा अपेक्षीत

- लहान जनावरांना प्रतिदिन ४० पाण्याची गरज

- मोठ्या जनावरांना ८० लिटर पाण्याची आवश्‍यकता

- प्रतिमाह १२ ते १४ हजार ७८० मे. टन चाऱ्याची गरज

water tanker file photo
Nashik Water Crisis : खामखेड्यात पाण्याअभावी टरबूज पीक धोक्यात! पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.