Nashik Water Crisis: सिन्नर तालुक्यात 6 टँकरद्वारे पाणीपुरवठा! रोज 21 फेऱ्या

Water Tanker
Water Tankeresakal
Updated on

सिन्नर : तालुक्यात यंदा पावसाळ्यातच पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू झाले आहेत. निऱ्हाळे गावासह २३ वाड्यांना पंचायत समितीतर्फे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

सहा टँकरद्वारे तालुक्यात २१ फेऱ्या रोज होत आहेत. पिपरवाडी, पांगरी खुर्द, मीठसागरे व पांगरीच्या वाड्यावस्त्यांवरून टँकरचे प्रस्ताव आले आहेत. प्रस्ताव मंजुरीसाठी तहसीलदारांनी प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविले आहेत. (Nashik Water Crisis Water supply through 6 tankers in Sinnar Taluka 21 rounds per day)

तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. खरिपाच्या पेरण्या वाया गेल्या, तर रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत. तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळी उपाययोजनांचा फायदा तालुक्यातील सर्व गावांना मिळणार आहे.

त्यामुळे दुष्काळी उपाययोजनांकडे नजरा लागून आहेत. शासनाच्या नियमानुसार दुष्काळी योजनांचा लाभ घेण्यासाठी डिसेंबरमध्ये अंतिम पैसेवारी जाहीर होण्याची शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे.

तालुक्यात १२८ गावे असून, त्यापैकी खरिपाची ११०, तर रब्बीची १८ गावे आहेत. १२८ गावांची सुधारित नजर पैसेवारी ५० पैशांच्या आत जाहीर झाली आहे.

सिन्नर तालुक्यात सरासरी ५५५ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा केवळ ३६८ मिलिमीटर म्हणजेच ६६ टक्के पाऊस पडला. शासनाने जाहीर केलेल्या राज्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये सिन्नरचा समावेश झाला आहे.

महसूल प्रशासनाने तालुक्यातील खरीप हंगामातील सप्टेंबरअखेरची नजर पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्याचा अहवाल शासनाला पाठवला होता. यात सोयाबीन, ज्वारी, मका, बाजरी आदी पिकांचा समावेश होता. आता ३१ ऑक्टोबरला सुधारित पैसेवारी जाहीर झाली.

१५ डिसेंबरला अंतिम पैसेवारी घोषित होणार आहे. सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने शासन अधिकृत दुष्काळाची घोषणा केली आहे. आता अंतिम पैसेवारी काय, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहे. पाऊस न झाल्याने रब्बीचा हंगाम हातचा गेला आहे.

शेती व जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न सध्या तीव्र असून, काही दिवसांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. पाण्याअभावी यंदा ज्वारी, कांदा व अन्य कुठलीही पिके घेता आली नाहीत. शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे.

महागडी जनावरे घेतली. मात्र, चारा आणि पाणीटंचाई असल्याने जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. दुष्काळ जाहीर झाल्याने छावण्या सुरू होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी केलेला खर्च मातीत मिळाला.

Water Tanker
Nashik Water Crisis: लासलगाव विंचूरसह सोळा गावांवर पाणीटंचाईचे सावट! थकीत वीजबिलाबाबत महावितरणकडून नोटीस

त्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना आर्थिक मदत तत्काळ मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मिळणाऱ्या सवलती

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता तालुक्यातील सर्व गावांतील शेतकऱ्यांच्या जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जांचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जवसुलीस स्थगिती, कृषीपंपाच्या वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, आवश्यक तेथे पाणीपुरवठ्यासाठी टँकर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे, शाळांमध्ये माध्यान्ह भोजन योजना व सुट्ट्यांमध्येही राबविणे आदी उपाययोजना केल्या जाणार आहेत.

"दुष्काळ जाहीर झाल्याचे शासन आदेश प्राप्त झाले आहेत. दुष्काळी योजनांचा लाभ दिला जाईल. काही योजनांसाठी निधीची आवश्यकता असते. रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली जातील. सध्या ज्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज आहे, त्या गावांसाठी टँकर सुरू करण्यात आले आहेत."-सुरेंद्र देशमुख, तहसीलदार

Water Tanker
Nashik Water Crisis: मोसम खोऱ्यात रब्बी हंगाम धोक्यात! जलसाठे कोरडेठाक; खरीप पिकांचेही नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.